भारतीय संघाला श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना बेंगलोरमध्ये खेळला जात आहे. हा सामना दिवस-रात्र स्वरूपाचा आणि गुलाबी चेंडूने खेळला जाणारा सामना आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ तयारीत आहे. अष्टपैलू अक्षर पटेल याने संघात पुनरागमन केले आहे, ज्यामुळे भारतीय संघाची ताकत अधिकच वाढली आहे. संघात पुनरागमन केल्यानंतर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने सामन्यापूर्वी त्याच्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) हा दुसरा कसोटी सामना बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियवर शनिवारी (१२ मार्च) सुरू झाला. या सामन्याच्या आधी अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याने अक्षर पटेल (Axar patel) याचे संघातील महत्त्व स्पष्ट केले.
दुसरा सामना सुरू होण्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत बुमराह म्हणाला की, ‘तो (अक्षर पटेल) संघाशी जोडला गेल्यानंतर ताकत वाढली आहे. तो असा खेळाडू आहे, जो गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्हीमध्ये त्याचे योगदान देऊ शकतो. यामुळे संघाची ताकत वाढते. अशात तो जेव्हा कधी फिट होतो, तेव्हा त्याच्यासाठी संघात जागा बनत असते. कारण कोणताही संघ अशा खेळाडूला नक्कीच त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेऊ इच्छित असेल.’
दरम्यान, अक्षर पटेल दुखापतीमुळे काही दिवसांपासून संघातून बाहेर होता. याच कारणास्तव तो दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जाऊ शकला नाही आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या मायदेशातील मालिकेतही खेळू शकता नाही. मोहलीमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातही अक्षर उपस्थित नव्हता. परंतु, आता तो फिट आहे आणि संघात पुनरागमन केले आहे. फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला अक्षर पटेलसाठी जागा मोकळी करावी लागली.
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी! आरसीबी संघ ‘या’ दिवशी करणार आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा; वाचा सविस्तर






