भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीतून श्रीलंकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू झाले बाहेर, ‘हे’ आहे कारण

भारताविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटीतून श्रीलंकेचे दोन महत्त्वाचे खेळाडू झाले बाहेर, हे आहे कारण

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना शनिवारी (१२ मार्च) सुरू झाला. त्यापूर्वी श्रीलंकन संघ आणि चाहत्यांना दोन मोठे झटके लागले आहेत. श्रीलंकेचा फलंदाज पाथुम निसांका आणि वेगवान गोलंदाज दुष्मंथा चमिरा हे दोन महत्वाचे खेळाडू दुसऱ्या कसोटीत सहभाग घेऊ शकले नाहीत. कर्णधार दिमुथ करुणात्नेने याविषयी महिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chameera) याच्या कार्यभाराचे व्यवस्थापन आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी श्रीलंक संघाला करायचे आहे. तसेच त्याला दुखापत देखील झालेली आहे. दुखापतीतून ठीक झाल्यानंतर चमिरा टी-२० विश्वचषकापर्यंत मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच खेळणार आहे.

इएसपीएन क्रिकइंफोने श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने (Dimuth Karunaratne) याच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, “मेडिकल पॅनलने (श्रीलंकन संघाच्या) आम्हाला सांगितले आहे की, आम्ही टी-२० विश्वचषकापर्यंत त्याला (चमिरा) दुखापतीतून ठीक केले पाहिजे आणि त्याला फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच वापरले पाहिजे.”

दरम्यान, दुसऱ्या कसोटीतून बाहेर होण्यापूर्वी चमिरा पहिल्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता. या सामन्यात श्रीलंका संघ एक डाव आणि २२२ धावांच्या मोठ्या अंतराने पराभूत झाला होता.

आयपीएल फ्रेंचायझी लखनऊ सुपर जायंट्सने दुष्मंथा चमिराला मेगा लिलावात मोठी रक्कम खर्च करून संघात सामील केले आहे. चमिराला संघात घेण्यासाठी लखनऊ फ्रेंचायझीने २ कोटी रुपये मोजले आहेत. अशात आयपीएल २०२२ हंगामात चमिरा लखनऊ संखासाठी मैदानात चांगले प्रदर्शन करेल, अशी अपेक्षा आहे.

पथुन निसांका (Pathum Nissanka) दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडल्यामुळे श्रीलंकन संघाला अधिक मोठा झटका बसला आहे. निसांका पहिल्या सामन्यात श्रीलंकेसाठी खेळला होता आणि चांगली फलंदाजी केली होती. पण दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत तो सहभागी होऊ शकला नाही. मोहिलीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात निसांकाने नाबाद ६१ धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेसाठी सर्वात्तम फलंदाजी करणारा खेळाडूही ठरला होता. आता या दोन महत्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत बेंगलोर कसोटी जिंकणे श्रीलंका संघासाठी अधिकच कठीण काम होऊन बसले आहे.

महत्वाच्या बातम्या –

नादच खुळा! मंधना-हरमनप्रीतची विक्रमी १८४ धावांची भागीदारी, मोडला ९ वर्षांपूर्वीचा ‘हा’ विक्रम

कॅलिसच्या ‘त्या’ शब्दांनी जादू केली अन् दक्षिण आफ्रिकेने ४३५ धावांचे आव्हान सहज पार केले

स्म्रीती मंधनाचे रेकॉर्डब्रेक शतक! विश्वचषकात १२३ धावांच्या खेळीसह तीन विक्रमात पटकावले अव्वल स्थान

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.