---Advertisement---

टीम इंडिया है ये, झुकेगी नहीं…! मोहाली कसोटी विजयानंतर विराटचे ‘पुष्पा सेलिब्रेशन’, व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

मोहाली| भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा पहिला कसोटी सामना (First Test) अतिशय खास राहिला. हा विराटचा कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना (Virat Kohli’s 100th Test) होता. या सामन्यात तो फलंदाजीत विशेष प्रदर्शन करू शकला नाही. परंतु त्याची छोटेखानी खेळीही संघाला सामना जिंकून देण्यात मदतशीर ठरली. भारतीय संघाने हा सामना तब्बल १ डाव आणि २२२ धावांच्या फरकाने जिंकला. हा सामना जिंकल्यानंतर विराटने खास सेलिब्रेशन करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दाक्षिणात्य चित्रपट ‘पुष्पा’ने भारतीयांना वेड लावले आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही महिने पालटल्यानंतरही सोशल मीडियावर पुष्पातील गाणी, हुक स्टेप चर्चेत आहेत. अगदी क्रिकेटक्षेत्रातील व्यक्तींवरही पुष्पाचा फिव्हर चढला आहे. आतापर्यंत बऱ्याच भारतीय आणि परदेशी क्रिकेटपटूंनी सामन्यादरम्यान पुष्पातील हुक स्टेप केल्या आहेत. यातच विराटचाही समावेश झाला आहे.

भारताने श्रीलंकेविरुद्धचा कारकिर्दीतील अतिशय खास सामना जिंकल्यानंतर पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन (Virat Kohli’s Pushpa Style Celebration) केले आहे. त्याने सामना जिंकल्यानंतर अल्लू अर्जुनची दाढीवरून हात फिरवतानाची स्टाईल कॉपी केली आहे. तो मोठ्या ऐटीत ही ‘पुष्पा झुकेगा नहीं’ची हुक स्टेप केली आहे. त्याचा अल्लू अर्जुनची नक्कल करतानाचा व्हिडिओ चाहत्यांना खूप भावत असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

रविंद्र जडेजानेही केले पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन 
विशेष म्हणजे, विराटपूर्वी अष्टपैलू रविंद्र जडेजा यानेही पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले आहे. जडेजाने श्रीलंकेविरुद्ध फलंदाजी करताना १७५ धावांची शानदार दीडशतकी खेळी केली होती. चक्क सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने हे खणखणीत दीडशतक ठोकले होते. त्याच्या या खेळीनंतर त्याची मुलाखत घेतली गेली. तेव्हा या मुलाखतीदरम्यान जडेजाने पुष्पा स्टाईल सेलिब्रेशन केले होते.

२ वेळा केला गेला विराट कोहलीचा सन्मान
भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील मोहाली कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी १०० वी कसोटी खेळत असलेल्या विराटचा सन्मान केला गेला होता. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराटला खास टोपी भेट देत त्याचा सन्मान केला होता. यावेळी विराटला त्याच्या शंभराव्या सामन्यानिमित्त शुभेच्छाही दिल्या होत्या. तसेच या खास क्षणी विराटची पत्नी अनुष्का शर्मा तिथे उपस्थित होती. विराटला प्रशिक्षक द्रविडने कॅप दिल्यानंतर तिने त्याची गळाभेट घेतली. याबरोबरच विराटने सन्मान झाल्यानंतर भावुक होत प्रतिक्रियाही दिली होती.

तसेच भारतीय संघाच्या पहिल्या डावानंतर भारतीय खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनरही दिला होता. प्रथम फलंदाजी करताना १२९.२ षटकांनंतर भारतीय संघाने ५७४ धावांवर त्यांचा डाव घोषित केला. हा पहिला डाव संपल्यानंतर सर्व भारतीय खेळाडू दुसऱ्या डावासाठी मैदानावर जमणार होते. यावेळी मैदानावर जाण्याआधी सर्वांनी एकत्र जमून विराटला गार्ड ऑफ ऑनर दिला होता.

 

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---