भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मलिकेचा पहिला सामना रविवारी (६ फेब्रुवारी) खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेतील या पहिल्या सामन्यात भारताने ६ विकेट्स राखून विजय मिळवला. विजयानंतर भारताने मालिकेत १-० अशी आघाडीही घेतली आहे. नियमित एकदिवसीय कर्णधाराच्या रूपातील रोहितचा हा पहिलाच सामना होता आणि त्याने ही भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली. परंतु विजयानंतरच्या त्याच्या प्रतिक्रियेतून असे वाटले की, तो या प्रदर्शनामुळे समाधानी नाहीये.
वेस्ट इंडीविरुद्धच्या या सामन्यात रोहितने संघाचे अप्रतिम नेतृत्व केले. त्याने सामन्यात घेतलेले निर्णय, गोलंदाजीतील बदल आणि डीआरएस अचूक ठरले. सोबतच त्याने वैयक्तिक ६० धावांची महत्वाची खेळीही केली. परंतु तरीही रोहितच्या मते हा सामना परफेक्ट नव्हता. सामना संपल्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, “मी परफेक्ट गेमवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही परफेक्ट असू शकत नाही, परंतु सर्वांनी चांगले प्रदर्शन केले.”
या कारणांमुळे रोहित शर्मा असमाधानी
भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली होती. पण, त्यानंतर पुढच्या ३२ धावा करण्यासाठी भारतीय संघाने ४ विकेट्स गमावल्या. लक्ष्य लहान असल्यामुळे भारताला विजय मिळाला. परंतु, लक्ष्य जर मोठे असते, तर संघ अडचणीत सापडला असता. त्याव्यतिरिक्त संघाने गोलंदाजी करताना ७९ धावसंख्येवर वेस्ट इंडीजच्या ७ विकेट्स घेतल्या होत्या, पण तरीही विरोधी संघ १७६ धावांपर्यंत पोहचू शकला. आठव्या विकेटसाठी जेसन होल्डर आणि फॅबियन ऐलन यांच्यात ७८ धावांची भागीदारी झाली. भारतीय संघाच्या प्रदर्शनात या दोन महत्वाच्या चुका आढळून आल्या. याच पार्श्वभूमीवर रोहित समाधानी नसावा.
रोहित पुढे बोलताना म्हणाला की, “फलंदाजी करताना आम्ही जास्त विकेट्स गमवायला नव्हत्या पाहिजे, ही पहिली गोष्ट. आम्ही त्यांच्या खालच्या फळीवर अधिक दबाव बनवू शकत होता. मी त्याच्याकडून श्रेय हिसकावून घेणार नाही. आम्ही सुरुवाताला आणि शेवटी ज्याप्रकारे गोलंदाजी केली, ती खूप उत्कृष्ट होती.” रोहितच्या मते गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन केले, पण अधिक चांगले करता आले असते.
महत्वाच्या बातम्या –
वर्षभरापूर्वी वाटलेले कारकीर्द संपणार; आता पठाण बंधूंच्या पाठींब्याने हुडा खेळला भारतीय संघात
पूर्णवेळ कर्णधार बनताच ‘हिटमॅन’ ठरला भारताचा सर्वोत्तम वनडे कॅप्टन
PRO KABADDI: पटना पायरेट्स टॉपवर; गुजरातविरूद्ध बेंगलोरचा धसमुसळा खेळ