Loading...

“विराट कोहलीची ही केवळ वेळच नाही, तर पर्व आहे”

भारतीय कर्णधार विराट कोहलीने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात 94 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर या टी20 सामन्यात भारताने 208 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजला 6 विकेट्सने पराभूत केले आणि 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

Loading...

या विजयाबरोबरच भारताने त्यांचा टी20मधील सर्वाेच्च धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करण्याचाही विक्रम केला आहे.

या सामन्यानंतर विराट कोहलीचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने कौतुक केले. विराटने या सामन्यात 50 चेंडूत 6 चौकार आणि 6 षटकारांसह नाबाद 94 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे वेस्ट इंडिजने दिलेल्या 208 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सोपे गेले.

त्यामुळे विराटच्या या खेळीचे कौतुक करताना सेहवागने ट्विट केले की ‘ही विराट कोहलीची वेळच नाही तर हे विराट कोहलीचे पर्व आहे. भारतीय संघाचा टी20 मधील सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग. केएल राहुलने चांगला पाठिंबा दिला आणि पंतनेही मोलाचे योगदान दिले.’

Loading...

 

केवळ सेहवागच नाही तर दिग्गज व्हीव्हीएस लक्ष्मणनेही भारतीय संघाचे आणि विराटचे कौतुक केले आहे. त्याने ट्विट केले की ‘भारतीय संघाचा टी20 मधील सर्वोच्च धावांचा यशस्वी पाठलाग. विराटची मास्टरक्लास खेळी, ज्यामुळे सर्व सहज सोपे दिसत होते. डावाची भक्कम सुरूवात करण्यात केएल राहुलचे उल्लेखनीय योगदान. भारतीय संघाला विजयाबद्दल अभिनंदन.’

Loading...
Loading...

 

Loading...

त्याचबरोबर ऑफस्पिनर हरभजन सिंगने ट्विट केले आहे की, ‘कोहली असेल तर काहीही शक्य आहे. केएल राहुलचीही चांगली खेळी आणि पंतचे चांगले योगदान.’

शुक्रवारी झालेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 207 धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) 56 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तर कायरन पोलार्डने(Kieron Pollard) 40 धावांची खेळी केली होती.

त्यानंतर 208 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार विराटने नाबाद 94 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर केेएल राहुलने(KL Rahul) सलामीला फलंदाजी करताना 40 चेंडूत 62 धावांची अर्धशतकी खेळी केली होती. तसेच रिषभ पंतने 9 चेंडूत 18 धावांची छोटेखानी चांगली खेळी केली.

You might also like
Loading...