भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) खेळला गेला. उभय संघातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियवर खेळली जात आहे. या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी केली आणि वरच्या फळीतील विकेट्स स्वस्तात गमावल्या. वेस्ट इंडीजच्या ओडियन स्मिथने (Odean Smith) एकाच षटकात दोन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.
भारताच्या फलंदाजी क्रमवारीत मोठा बदल पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात सलामीवीराची भूमिका निभावणारा ईशान किशन दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही. तसेच उपकर्णधार केएल राहुलनेही दुसऱ्या सामन्यातून संघात पुनरागमन केले. पहिल्या सामन्यासाठी केएल राहुल अनुपस्थित असल्यामुळे ईशान किशनला सलामीवीराची भूमिका पार पाडता आली. अशात पुनरागमनानंतर राहुल डावाची सुरुवात करेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. परंतु झाले मात्र वेगळेच.
रोहित शर्मा (rohit sharma) सोबत यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (rishabh pant) सलामीसाठी मैदानात आला. याचा परिणाम असा झाला की, संघाने वरच्या फळीतील तीन महत्वाच्या विकेट्स अवघ्या ४३ धावांवर गमावल्या.
भारताच्या फलंदाजीवेळी १२ व्या षटकात वेस्ट इंडीजचा गोलंदाजी अष्टपैलू ओडियन स्मिथ गोलंदाजीसाठी आला. स्मिथने या षटकात कमाल प्रदर्शन करून विराट कोहली (virat kohli) आणि रिषभ पंत यांना तंबूचा रस्ता दाखवला. ओडियनच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रिषभ पंत १८ धावा करून जेसन होल्डरच्या हातात झेलबाद झाला. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विराट कोहली १८ धावा करून यष्टीरक्षक शाई होपच्या हाताच झेल देऊन बाद झाला. या दोघांनी सामन्यात प्रत्येकी तीन-तीन षटकार मारले. विराटची विकेट गमावल्यानंतर भारताची धावसंख्या ४३ धावांवर ३ बाद अशी होती.
Odean Smith strikes twice! 💥
West Indies dismiss Rishabh Pant and Virat Kohli in quick succession.
India are three down for 43 after 12 overs.#INDvWI | https://t.co/1bhdqBexF0 pic.twitter.com/PdEgsvKx1i
— ICC (@ICC) February 9, 2022
त्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माच्या रूपात भारतीय संघाला पहिल्या झटका मिळाला होता. रोहिन अवघ्या पाच धावा करून वेगवान गोलंदाज केमार रोचच्या चेंडूवचा यष्टीरक्षक शाई होलच्या हातात झेल देऊन बाद झाला. नियमित सलामीवीर म्हणून नावारूपाला आलेला केएल राहुल मात्र या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, तसेच सूर्यकुमार यादव पाचव्या क्रमांकावर खेळताना दिसला.
महत्वाच्या बातम्या –
आयपीएल: मुंबई-चेन्नईसह ७ संघांचे कर्णधार निश्चित, तर ‘हे’ ३ संघ अजूनही कर्णधाराच्या शोधात; पाहा यादी
मोठी बातमी! आयपीएलमधील अहमदाबाद संघाचे नाव अखेर फायनल, पाहा काय झालंय नामकरण
वनडे रँकिंगमध्ये भारतीय महिला क्रिकेटपटूंचा बोलबाला! मंधानाचा टॉप ५ मध्ये, तर मिताली ‘या’ स्थानी