भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यात शुक्रवारी (१८ फेब्रुवारी) टी२० मालिकेतील दुसरा सामना (Second T20I) झाला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात ५ बाद १८६ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ १७८ धावाच करू शकला. परिणामी भारताने ८ धावांनी हा सामना जिंकला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाच्या या सामना विजयात यष्टीरक्षक रिषभ पंत (Rishabh Pant) आणि अष्टपैलू वेंकटेश अय्यर (Venktesh Iyer) यांनी मिळून एक विशेष विक्रम केला आहे.
भारताच्या टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात असे पहिल्यांदाच झाले आहे, जेव्हा पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील फलंदाज २५ पेक्षा जास्त धावा बनवताना १८० च्या स्ट्राईक रेटने खेळले आहेत.
या सामन्यात इशान किशन (२ धावा) स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार रोहित शर्माही (१९ धावा) लवकरच तंबूत परतला. त्यानंतर सूर्यकुमार यादवने आक्रमक सुरुवात करत त्याचा इरादा स्पष्ट केला. परंतु त्याला तोही ८ धावांवर पव्हेलियनला परतला. पुढे विराट कोहलीने ५२ धावा करत डाव सावरला. विराटनंतर डावाचा वेगाने पुढे नेण्याचे नाव काम केले पंत आणि अय्यरच्या जोडीने.
हेही वाचा- विराटबरोबरच ‘या’ फॉर्मात असलेल्या खेळाडूला अर्ध्यातूनच विश्रांती, तिसऱ्या टी२०त असेल अनुपलब्ध
पंतने पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत २८ चेंडूंमध्ये नाबाद ५२ धावा केल्या. यादरम्यान त्याने १ षटकार आणि ७ चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट १८५.७१ इतका होता. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना अय्यरने १८ चेंडूंमध्ये १ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. त्याने १८३.३३ च्या स्ट्राईक रेटने ही खेळी खेळली.
या दोन्ही फलंदाजांमध्ये पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूंमध्ये ७६ धावांनी जलद भागिदारीही झाली. अखेर वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज रोमॅरिओ शेफर्ड याने अय्यरला त्रिफळाचीत करत त्यांची भागिदारी मोडली होती.
पंत आणि अय्यरच्या ताबडतोब खेळी तसेच विराट कोहलीचे अर्धशतक, या खेळींच्या जोरावर भारताने वेस्ट इंडिजला १८७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा बचाव करताना वेस्ट इंडिजच्या यष्टीरक्षक निकोलस पूरनने भारतीय गोलंदाजांची दमछाक करून सोडली होती. त्याने ४१ चेंडूंमध्ये ६२ धावा फटकावल्या होत्या. तसेच रोवमन पॉवेल यानेही नाबाद ६८ धावांची खेळी केली होती. परंतु ते दोघेही संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.
आता भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसरा व शेवटचा टी२० सामना २० फेब्रुवारी रोजी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटबरोबरच ‘या’ फॉर्मात असलेल्या खेळाडूला अर्ध्यातूनच विश्रांती, तिसऱ्या टी२०त असेल अनुपलब्ध
रणजीच्या रणांगणातही पुजारा फेल! मुंबईविरुद्ध फोडू शकला नाही भोपळा
विजयानंतरही कर्णधार रोहितने टोचले टीम इंडियाचे कान; म्हणाला…






