भारतीय संघात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीनंतर कोण घेणार हा प्रश्न निकालात निघाला असून त्याचे उत्तर रिषभ पंत आहे. जुलै महिन्यात इंग्लविरूद्ध पदार्पण करणाऱ्या रिषभनेे फलंदाजीत छाप पाडली आहे. यष्टीरक्षणात मात्र त्याला अजून सुधारणा करावी लागणार आहे.
अॅडम गिलख्रिस्टने जे कार्य आॅस्ट्रेलियाच्या संघासाठी केले आहे. तेच कार्य रिषभ पंत भारतीय संघासाठी करू शकतो असा विश्वास भारताचे माजी महान कर्णधार सुनिल गावस्कर यांना वाटतो.
सध्या हैद्राबाद येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात रिषभने दमदार अर्धशतकी खेळी केली आहे. या खेळीचे कौतुक गावस्करांनी केले आहे.
“सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराटची विकेट पडल्यानंतर भारतीय संघाला महत्वपुर्ण भागिदारीची गरज होती. रिषभ पंत आणि अजिंक्य रहाणने अतिशय महत्वपुर्ण भागिदारी केली. रिषभ पंत आणि सलामीवीर पृथ्वी शाॅ या दोघांची आत्मविश्वास पुर्ण फलंदाजी पाहताना खुप बरे वाटले.” असे गावसकरांनी सांगितले.
“रिषभ 6 व्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. जसे आॅस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट यायचा आणि भरपुर धावा काढायचा त्यामुळे आस्ट्रेलियाचा संघ 300-400 धावांचा टप्पा आरामात गाठायचा. गिलख्रिस्टची भुमिका भारतीय संघात निभावण्याची क्षमता रिषभ पंतमध्ये आहे.” असेही गावसकर यांनी सांगितले.
रिषभ पंतने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 143 चेंडूत 92 धावांची खेळी केली. त्याच बरोबर त्याने अजिंक्य रहाणे सोबत केलेल्या 152 धावांच्या भागिदारीमुळे भारतीय संघाला पहिल्या डावानंतर 56 धावांची आघाडी घेण्यात यश आले होेते.
महत्वाच्या बातम्या-
- धोनीने जे करुन दाखवलं तेच आज रिषभ पंतने पुन्हा केलं
- बर्थडे बाॅय गौतम गंभीरने ओमर अब्दुल्लांना झाप- झाप झापले
- कसोटी सामना सुरु असतानाच रोहित शर्माचे नाव या संघाच्या प्लेयिंग ११ मध्ये