वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात रविवारी (२४ जुलै) त्रिनिदाद येथे झालेला दुसरा वनडे सामना भारताने २ विकेट्सने जिंकला. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका २-० अशी जिंकली आहे. धावांचा पाऊस पडलेल्या या सामन्यात भारताचा अष्टपैलू अक्षर पटेलने तुफानी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही आपल्या नावे केले आहेत.
दुसऱ्या वनडेत भारतीय संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या १० षटकात १०० धावांची आवश्यकता होती. भारताचा निम्मा संघ तंबूत परतला असताना फिरकीपटू अक्षर पटेल (Axar Patel) याने ३५ चेंडूत ६४ धावा केल्या. त्याने १८२.८६च्या स्ट्राईक रेटने खेळताना ३ चौकार आणि ५षटकार मारले. त्याने दीपक हुड्डाच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ३३ चेंडूत ५१ धावांची भागीदारी केली. हुड्डा बाद झाल्यावर भारताला ६ षटकात ५६ धावा करायच्या होत्या. हुड्डा ३३ धावा करत बाद झाला.
अक्षरने हुड्डा बाद झाल्यावर आक्रमक नाही तर शांतपणे फलंदाजी केली त्याने २७ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. हे वनडे क्रिकेटमधील भारताकडून वेस्ट इंडिज विरुद्ध केलेल सर्वात जलद अर्धशतक ठरले आहे. पाच वर्षानंतर वनडेत पुनरागमन करताना त्याने केलेल्या या धडाकेबाज खेळीने सगळे आश्चर्यचकीत झाले आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्याआधी अक्षरने ऑक्टोबर २०१७मध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामना खेळला होता. या सामन्यातच त्याने फलंदाजी केली नव्हती. आतापर्यंत खेळलेल्या ४० वनडे सामन्यातील २२व्या डावात त्याने हे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले. या सामन्यात त्याने ५०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
धोनी स्टाईलने षटकार मारणाऱ्या अक्षरने माजी कर्णधार एसएस धोनी याचा एक विक्रमही मोडीत काढला आहे. त्याने या सामन्यात ५ षटकार मारले. यामुळे तो आता वनडे सामन्यात धावांचा विजयी पाठलाग करताना भारताकडून ७व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना सर्वाधिक षटकार मारणाऱ्या यादीत पहिल्या स्थानावर आला आहे. धोनीनने २००५मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध ३ षटकार मारले होते.
.@akshar2026 played a sensational knock & bagged the Player of the Match award as #TeamIndia beat West Indies in the 2nd ODI to take an unassailable lead in the series. 👏 👏 #WIvIND
Scorecard▶️ https://t.co/EbX5JUciYM pic.twitter.com/4U9Ugah7vL
— BCCI (@BCCI) July 24, 2022
वनडेत धावांचा विजयी पाठलाग करताना भारताकडून ७व्या किंवा खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू-
५ – अक्षर पटेल वि. वेस्ट इंडिज, २०२२
३ – एमएस धोनी वि. झिम्बाब्वे, २००५
३ – युसूफ पठाण वि. दक्षिण आफ्रिका, २०११
३ – युसूफ पठाण वि. आयर्लंड २०११
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रेकॉर्ड्स चांगले असूनही अर्शदीपच्या आधी आवेशला का मिळाली संधी?’, चाहत्यांनी विचारले प्रश्न
‘सामन्यानंतर बोलताना अय्यरची जीभ घसरली अन् पुढे….’, व्हिडिओ व्हायरल
आवेशचं भविष्य धोक्यात! वनडे पदार्पणातच ठरला असता संघाच्या पराभवाचं कारण