भारतीय पुरूष क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर (WIvsIND) आहे. या दौऱ्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला. या मालिकेतील पहिले तीन सामने वेस्ट इंडिजमध्ये खेळले जाणार आहेत, तर शेवटचे दोन सामने अमेरिका (Cricket In America) येथे खेळले जाणार होते. मात्र ते आता अशक्य होताना दिसत आहे. त्यामागचे कारणच तेवढे मोठे आहे.
क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, दोन्ही संघांतील काही खेळाडूंना अमेरिकेचा व्हिजा मिळाला नाही. यामुळे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डला पर्यायी योजना आखावी लागली आहे. हे दोन सामने ६ आणि ७ ऑगस्टला फ्लोरिडा, अमेरिका येथे खेळले जाणार होते. मात्र भारत आणि वेस्ट इंडिजच्या काही खेळाडूंना अमेरिकेचा व्हिजाच मिळालेला नाहीये. एका सूत्राकडून कळाले की, “व्हिजाच्या समस्यांवर योग्य तो तोडगा काढला जाईल. तसेच हे दोन्ही सामने वेस्ट इंडिजमध्येच होण्याची दाट शक्यता आहे.”
अमेरिकेला जाण्यासाठी खेळाडूंना व्हिजा सेंट किट्स येथे दिला जाणार होता. जेथे दोन्ही संघाचे खेळाडू पोहोचले आहेत. तसेच खेळाडूंना त्रिनिदादला पुन्हा परतावे लागणार आहे, कारण तेथूनच हिरवा कंदील मिळाला तर संघ अमेरिकेला रवाना होतील. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डने फ्लोरिडामध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यांबाबत शंका उपस्थित केली आहे. अध्यक्ष रिकी स्कोरिट म्हणाले, “व्हिजा बरोबरच सामने कुठे खेळवायचे याचाही आम्ही विचार करत आहोत.”
भारत विरूद्ध वेस्ट इंडिज टी२० सामने आधीही अमेरिकेत खेळवला गेला आहे. अमेरिकेत क्रिकेटचा अधिक प्रसार व्हावा यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) तेथे अधिक सामने आयोजित करत आहे. तसेच २०२४मध्ये खेळल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकाचे यजमानपद संयुक्तपणे वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांना दिले गेले आहे.
भारताने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. यातील दुसरा सामना सोमवारी (१ ऑगस्ट) खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘राष्ट्रकुल’ क्रिडा स्पर्धेचा इतिहास माहितीये?, जाणून घ्या एका क्लिकवर
भारतासाठी तिसऱ्या खेळाडूने रचली ‘सुवर्ण’गाथा, जिंकले कॉमनवेल्थ २०२२ मधील सहावे पदक
आघाडी घेण्यासाठी ही सेना उतरवणार रोहित? यजमानांची अशी असेल रणनिती?