---Advertisement---

मोठी बातमी.! वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यासाठी ‘या’ दोन खेळाडूंचा भारतीय संघात समावेश

On: शनिवार, फेब्रुवारी 5, 2022 9:20 PM
Ishan-Kishan-and-Shahrukh-Khan
---Advertisement---

अखिल भारतीय निवड समितीकडून (All-India Senior Selection Committee) वेस्ट इंडीज संघाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारतीय संघात आणखीन दोन खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. इशान किशन (Ishan Kishan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) या दोन युवा आणि प्रतिभावान खेळाडूंचा निवडसमितीने टीम इंडियात समावेश केला आहे. (IND vs WI Ishan Kishan and Shahrukh Khan added to squad for 1st ODI)

रविवार (६ फेब्रुवारी) रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघात पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. त्यापूर्वी इशान आणि शाहरुख यांच्यासाठी गुड न्यूज आली असून. टीम इंडियाच्या प्रमुख संघात त्यांचा समावेश झाला आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---