वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. फिरकीपटू कुलदीप यादव या महिन्यात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेसाठी रवाना झाला आहे. या चायनामन गोलंदाजाने त्याच्या इंन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेयर करत वेस्ट इंडिजला रवाना होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कुलदिप यादव (Kuldeep Yadav) घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेमध्ये खेळणार होता, मात्र हाताच्या जखमेमुळे तो त्या मालिकेस मुकला होता. तो आता पूर्णपणे तंदुरूस्त असून वेस्ट इंडिज विरुदध भारतीय संघात पुनरागमन करण्यास आतुर आहे. त्याने इंन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले, ‘माझ्या संघासहकाऱ्यासोबत जुळण्यासाठी अजून वाट पाहवली जात नाही.’
View this post on Instagram
या दौऱ्यावर जाण्यापूर्वी कुलदिपने फिटनेसची चाचणी दिली होती. त्यामध्ये उत्तीर्ण झाल्याने त्याला वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी संमती मिळाली आहे. या दौऱ्यात त्याच्याबरोबरच रवीचंद्रन अश्विन आणि रवी बिश्नोई हे स्टार फिरकीपटू आहेत. तर अष्टपैलूमध्ये रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि दीपक हुड्डा यांचाही टी२०च्या संघात सामवेश आहे.
एकीकडे कुलदीप वेस्ट इंडिजला रवाना झाला तर दुसरीकडे भारताचा उपकर्णधार केएल राहुल (KL Rahul) कोरोना पॉजिटीव्ह आढळला आहे. तो वेळेवर ठीक झाला तर या मालिकेत खेळू शकेल. ही मालिका भारत रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तर या दौऱ्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने शिखर धवन (Shikhar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली २-० अशी आघाडी घेतली आहे.
या टी२० मालिकेतील शेवटचे दोन सामने अमेरिकेत खेळले जाणार आहेत. ६ आणि ७ ऑगस्ट हे दोन सामने फ्लोरिडामध्ये खेळले जाणार आहेत. यातील २९ जुलैला होणारा पहिला त्रिनिदाद,तर १ आणि २ ऑगस्टला होणारे सामने किट्सला खेळले जाणार आहेत.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा टी२० संघ
रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा. हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, इशान किशन, केएल राहुल, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हाऊ इज द जोश!’ मालिका विजयानंतर टीम इंडियाचे जोरदार सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
अक्षरने षटकार लगावत सामनाच नाही तर धोनीचा रेकॉर्डही केलायं फिनीश, रचले ‘हे’ दोन नवीन विक्रम
‘रेकॉर्ड्स चांगले असूनही अर्शदीपच्या आधी आवेशला का मिळाली संधी?’, चाहत्यांनी विचारले प्रश्न