भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी (९ फेब्रुवारी) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियाममध्ये पार पडला. भारताने या सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. अष्टपैलू दीपक हुड्डाने (deepak hooda) या मालिकेतून एकदिवसीय पदार्पण केले. यानंतर विराट कोहली (virat kohli) आणि एमएस धोनी (ms dhoni) यांच्याकडून पदार्पणाची कॅप मिळवणे, हे माझे लहानपणीपासूनचे स्वप्न होते आणि ते पूर्ण झाल्याचे हुड्डा म्हटला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातील विजयानंतर मध्यक्रमातील फलंदाज सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी बीसीसीआय टीव्हीसाठी मुलाखत दिली. हुड्डा यावेळी म्हणाला की, “पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण करणे माझ्यासाठी अद्भुत अनुभव होता. मी नेहमीच या दिवसासाठी मेहनत घेतली होती. विजयी संघाचा भाग बनून मला धन्य झाल्यासारखे वाटत आहे.”
A candid chat between the two 🙂
You do not want to miss this 👌
Stay tuned ⏳#TeamIndia | #INDvWI | @Paytm pic.twitter.com/lTYm4lnZMx
— BCCI (@BCCI) February 9, 2022
From his dreams and motivation to receiving #TeamIndia cap from @imVkohli! 🧢 👍@HoodaOnFire shares it all in this interview with @surya_14kumar after India win the 2⃣nd @Paytm #INDvWI ODI. 👌 👌 By @Moulinparikh
Watch the full interview 🎥 🔽 https://t.co/5roTjdrMAR pic.twitter.com/dBglzXqmJE
— BCCI (@BCCI) February 10, 2022
एकदिवसीय पदार्पणाविषयी बोलताना पुढे हुड्डा म्हणाला की, “एमएस धोनी किंवा विराट कोहली यांच्यापैकी कोणा एकाकडून कॅप मिळवणे माझे लहानपणीपासूनचे स्वप्न होते. विराट भैयाकडून कॅप मिळवणे एक अद्भुत अनुभव होता. मी माझा खेळ अधिक मजबूत बनवण्याच्या प्रक्रियेवर कम केले आहे. चांगले वाटत आहे, पण आपण स्वतःला नेहमी तयार ठेवले पाहिजे. अर्थात विराट कोहली, रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणे, हे माझे चांगले नशीब आहे. मी त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे. माझा प्रयत्न खेळावर लक्ष देणे आणि कुटुंबाविषयी जास्त चिंता न करणे आहे.”
Truly honoured and blessed on getting the opportunity to represent my country🇮🇳💙
A very special and dream come true moment for me to receive the cap from @imVkohli bhaiya.
Thank you to each and everyone involved in this wonderful journey!! pic.twitter.com/7bTTbPAWLa— Deepak Hooda (@HoodaOnFire) February 6, 2022
दरम्यान, भारत आणि वेस्ट इंडीजमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्याचा विचार केला, तर वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ विकेट्सच्या नुकसानावर २३७ धावा केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ १९३ धावा करून सर्वबाद झाला. भारतासाठी प्रसिद्ध कृष्णाने ९ षटकांमध्ये १२ धावा खर्च केल्या आणि चार महत्वाच्या विकेट्स घेतल्या. या उत्कृष्ट कामगिरीसाठी कृष्णाला सामनावीर निवडले गेले. उभय संघातील तिसरा एकदिवसीय सामना ११ फेब्रुवारीला खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
देने वाला जब भी देता,देता छप्पर फाड के, अंडर १९ WC नंतर यश धूल साठी आणखी एक आनंदाची बातमी
“यावेळी माझ्यावर बोली लागणार”; युवा अफगाणी फलंदाजाने व्यक्त केला विश्वास
WWE सुपरस्टार ‘द ग्रेट खली’ भाजपाच्या झेंड्याखाली, दिल्लीत स्विकारले BJPचे सदस्यत्व