भारतीय संघाचा (team india) उत्कृष्ट फलंदाज सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) याने अजून भारतासाठी अधिक सामने खेळलेले नाहीत. परंतु जे सामने खेळले आहेत, त्यामध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. अशात त्याची तुलना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज आणि फिनिशर मायकल बेवन (michael beven) यांच्याशी होऊ लागली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यापूर्वी सूर्यकुमारने पत्रकारांशी संवाद साधला आहे.
पत्रकारांनी सूर्यक्रमारशी बोलताना त्याची तुलना मायकल बेवनशी केली. त्यावर सूर्यकुमार म्हणाला त्याला इतरांशी तुलना केलेली आवडत नाही. तो म्हणाला की, “मला सूर्यकुमार यादवच राहू द्या. मी कसेबसे भारतासाठी पाच-सहा सामने खेळले आहेत, पण हो प्रयत्न करत आहे. ज्या क्रमांकावर मला फलंदाजी करण्याची संधी मिळाते, माझे लक्ष्य संघाला विजय मिळवून देणे असेल.”
आतापर्यंत भारतासाठी टी२० आणि एकदिवसीय प्रकारांमध्ये खेळताना सूर्यकुमारने तीन, चार, पाच आणि सहा या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करताण्यासाठी आला होता. यासंदर्भात बोलताना तो म्हणाला की, “हे खूप वेगळे नाहीय. मी सर्व क्रमांकांवर फलंदाजी करत आलो आहे आणि त्याविषयी लवचीक आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापन ज्या क्रमांकावर निर्णय घेईल आणि त्याची इच्छा असेल की, मी त्या क्रमांकावर फलंदाजी करावी, मी त्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी तयार आहे.”
यावेळी बोलताना सूर्यकुमारने तो गोलंदाजी करण्यासाठी देखील कधीही तयार असल्याचे सांगितले आहे. तो पुढे बोलताना म्हणाला की, “होय, जेव्हा कधी मला संधी मिळेल, तेव्हा गोलंदाजी करेल. मी नेट्सवर नियमित गोलंदाजी करतो, जेव्हा कधी त्यांना वाटेल, तेव्हा ते माझा वापर करू शकतात. मी नेहमी उपलब्ध आहे.”
दरम्यान, वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने सहा विकेट्सने विजय मिळवला. पहिल्या सामन्यातील विजयामध्ये सूर्यकुमारच्या ३४ धावांचे महत्वाचे योगदान होते. या विजयानंतर भारताने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामने ९ फेब्रुवारीला खेळला जाईल. तर तिसरा आणि शेवटचा सामना ११ फेब्रुवारीला खेळला जाईल.
महत्वाच्या बातम्या –
सचिनच्या झंझावातापुढे मुंबाची शरणागती! पटना पायरेट्स पहिल्या स्थानी कायम
‘प्लेअर ऑफ द मंथ’साठी आयसीसीने जाहीर केली नामांकने; ‘बेबी एबी’चाही समावेश
काय सांगता! आयपीएल लिलावात आरसीबी ‘या’ तीन खेळाडूंवर खर्च करू शकते तब्बल २७ कोटी