भारत आणि वेस्ट इंडीज (ind vs wi odi series) यांच्यातील एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या मालिकेविषयी चाहत्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. गुरुवारी (३ जानेवारी) भारतीय संघाने (team india) सरावाला सुरुवात केली आहे. कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma), दीपक चाहर (deepak chahar) यांच्यासह इतर अनेक खेळाडूंनी या सराव सत्रात सामील झाले होते. तत्पूर्वी संघातील तीन खेळाडू आणि सपोर्ट्स स्टाफच्या काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सशी यासंदर्भात बोलताना सांगितले की, चांगली गोष्ट आहे की, संघातील खेळाडूंमध्ये कोरोना संक्रमाणचे नवीन रुग्ण आढळले नाहीत. रोहित शर्मा, दीपक चाहर आणि काही इतर खेळाडूंनी सराव सुरू केला आहे. ज्या खेळाडूंचे आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांचे अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत, त्यांना ७ दिवस विलगीकरणात घालवावे लागतील. मयंक अगरवाल शनिवारी संघात सामील झाला आहे.
हेही वाचा- मयंक अगरवाल नसेल पंजाब किंग्जचा नवा संघनायक? फ्रँचायझीचं जरा वेगळंच आहे मत
दरम्यान, यापूर्वी केल्या गेलेल्या कोरोना चाचणीमध्ये संघातील तीन खेळाडूंसह सपोर्ट स्टाफच्या काही सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले होते. संघातील खेळाडूंपैकी शिखर धवन, ऋतुराज गायकवाड आणि श्रेयस अय्यर या महत्वाच्या खेळाडूंना कोरोना झाली आहे आणि त्यांना ७ दिवसांसाठी विलगीकरणात राहावे लागणार आहे.
वेस्ट इंडीज संघाविरुद्धची एकदिवसीय मालिका ६ फेब्रुवारीपासून खेळली जाणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सामने ६, ९ आणि ११ फेब्रुवारीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळले जातील. त्यानंतर उभय संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाईल. टी-२० मालिकेतील सामने कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर १६, १८ आणि २० फेब्रुवारीला खेळले जातील.
Indian players in practice session today 💪 #INDvWI pic.twitter.com/D3BDmFQhLw
— Neeraj (@RealHimalayaGuy) February 3, 2022
वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वाशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अवेश खान.
वेस्ट इंडीविरुद्ध टी-२० मालिकेसाठी निवडला गेलेल्या भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्य कुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकुर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, वाशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
महत्वाच्या बातम्या –
क्रिकेटर असताना नशिबी आला नाही एकही विश्वचषक, आता लक्ष्मण प्रशिक्षकाच्या रूपात उंचावणार ट्रॉफी?
जयपूर पिंक पँथर्सने ‘टेबल टॉपर’ दबंग दिल्लीची केली पुरती दैना, ६ गुणांनी जिंकला सामना