---Advertisement---

तूम्ही जर रोहित फॅन असला तर ही आहे तुमच्यासाठी खास आकडेवारी

On: गुरूवार, नोव्हेंबर 1, 2018 8:14 PM
---Advertisement---

तिरुअनंतपुरम | विंडीज विरुद्धच्या शेवटच्या वनडे सामन्यात भारताने 9 विकेट्सने सहज विजय मिळवत पाच सामन्यांची वनडे मालिका 3-1 अशी खिशात घातली.

विंडीजने दिलेल्या 105 धावांचा पाठलाग करताना भारताने 14.5 षटकातच हा सामना जिंकला. यावेळी  भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली यांनी अनुक्रमे नाबाद 63 आणि 33 धावा केल्या. यावेळी रोहितने आजच्या सामन्यात खेळताना अनेक विक्रम मोडले.

यातील रोहितचे काही खास विक्रम-

1. वन-डे इतिहासात सर्वात कमी डावात अर्थात केवळ १८७ डावात रोहितने २०० षटकार मारले आहेत. यापुर्वी हा विक्रम शाहिद आफ्रिदीच्या नावावर होता. त्याने १९५व्या डावात २००वा षटकार खेचला होता.

2. भारतात वन-डेत १०० षटकार मारणारा रोहित केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. यापुर्वी केवळ धोनीने भारतात १००पेक्षा जास्त षटकार खेचले आहेत.

3. 200 षटकार मारणारा दुसरा भारतीय तर जगातील सातवा फलंदाज. यापुर्वी धोनीने वनडेत २०० षटकार मारले आहेत.

4. रोहितने तिसऱ्यांदा कॅलेंडर वर्षात वन-डेत 1000 धावा पूर्ण केल्या. याआधी 2013 आणि 2017ला अशी कामगिरी केली होती.

5. सात वेळा कॅलेंडर वर्षात वन-डेत 50 पेक्षा अधिक सरासरी राखणारा (500 धावा किंवा त्यापेक्षा अधिक) रोहित दुसराच खेळाडू. असा पराक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिविलियर्सने केला आहे.

सचिन तेंडुलकर, जॅक कॅलिस, एमएस धोनी आणि विराट कोहली यांनी सहा वेळा अशी कामगिरी केली आहे.

6. रोहित शर्मा आणि विराट कोहली वन-डेत 4000 धावा पूर्ण करणारी सातवी भारतीय जोडी

महत्त्वाच्या बातम्या:

धोनीवर आजपर्यंत अशी वेळ कधीच आली नव्हती

सव्वादोन तासात भारतीय गोलंदाजांनी असा काही कारनामा केला की कुणी विचारही केला नसेल

एकवेळ क्रिकेट गाजवणाऱ्या सर्वच दिग्गजांचे विक्रम रोहितने आरामात घातले खिशात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment