भारतीय संघ पुढच्या महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. 12 जुलै रोजी उभय संघांतील दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू होईल. त्यानंतर तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी-20 मालिका देखील या दोन संघात खेळली जाणार आहे. शुक्रवारी (23 जुलै) भारतीय संघाने वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेसाठी संघ घोषित केला. संजू सॅमसन मोठ्या काळानंतर या संघात पुनरागमन करू शकला.
संजू सॅमसन (Sanju Samson) भारतीय क्रिकेटमधील काही मोजक्या गुणवंत फलंदाजांपैकी एक आहे. त्याचे शॉट सिलेक्शन आणि खेळण्याची शैली पाहून नेहमीच चाहत्यांकडून त्याला पसंती मिळत आली आहे. मात्र, अनेकदा गुणवत्ता असून देखील त्याला संघातून बाहेर बसावे लागले. भारतासाठी खेळण्याची वाढत चाललेली स्पर्धा नेहमीच संजूला माहागात पडली. जुलै 2015 मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण करणाऱ्या संजूला आजपर्यंत फक्त 11 वनडे आणि 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने आपला शेवटचा वनडे सामना 25 नव्हेंबर 2022 रोजी, तर शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जानेवारी 2023 मध्ये खेळला आहे.
असे असले तरी, आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यात संजूला पुन्हा एक संधी मिळाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि आणि वनडे मालिकेसाठी शुक्रवारी बीसीसीआयने संघ घोषित केला. या दोन्ही संघांकडे पाहिल्यानंतर संजू सॅमसनचे नाव वाचून चाहत्यांना दिलासा मिळाला. येत्या काळात भारताला आशिया चषक आणि वनडे विश्वचषक खेळायचा आहे. आशात वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी निवडलेला वनडे संघ एकप्रकार आशिया चषक आणि वनडे विश्वचषकासाठीची संघ मानला जात आहे. चाहते आणि जानकारांचा अंदाज खरा ठरला, तर सॅमसन भारतासाठी आघामी वनडे विश्वचषक देखील खेळू शकतो. दरम्यान, चाहते 17 जुलैपासून सॅमसनची फटकेबाजी पाहू शकतात, जेव्हा उभय संघांतील वनडे मालिका सुरू होईल.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा वनडे संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ
रोहित शर्मा (कॅप्टन), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
सॅमसनचे अलिकडच्या काळातील प्रदर्शन पाहिले तर ते साधारन आहे. मात्र, वेस्ट इंडीज दौऱ्यात त्याच्याकडून संघ मोठ्या खेळीच्या अपेक्षेत असेल. वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 330, तर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 301 धावा केल्या. आयपीएलमध्ये सॅमसन राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार राहिला आहे. त्याच्या नेतृत्वात राजस्थान संघ मागच्या काही वर्षांमध्ये आपले सर्वोत्तम प्रदर्शन करत आहे. (IND vs WI Sanju Samson returns to the Indian ODI team.)
महत्वाच्या बातम्या –
मोठी बातमी: ‘अजिंक्य’ रहाणे पुन्हा बनला टीम इंडियाचा उपकर्णधार, दीड वर्षानंतर पुनरागमन करताच मिळाली जबाबदारी
VIDEO । एलिस पेरीचं हार्टब्रेक! कारकिर्दीतील महत्वाच्या सामन्यात एक रन कमी पडल्याने हुकल शतक




