इंग्लंडविरुद्ध टी-२० मालिकेतील उत्कृष्ट विजयानंतर वेस्ट इंडीज संघ भारत दौऱ्यासाठी तयार आहे. कर्णधार कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या नेतृत्वातील वेस्ट इंडीज संघ मंगळवारी (०१ फेब्रुवारी) भारतात दाखल होईल. भारतात आल्यानंतर वेस्ट इंडीज संघ अहमदाबादमध्ये तीन दिवसांच्या विलगीकरणात राहिल. त्यानंतर अहमदाबादमध्ये भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाईल. तत्पूर्वी वेस्ट इंडीजच्या जेसन होल्डर (Jason Holder) याने आगामी मालिकेविषयी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
होल्डरच्या मते भारतात विजय मिळवणे अवघड असेल, पण अशक्य नाही. भारत दौऱ्यापूर्वी घेतल्या गेलेल्या पत्रकार परिषदेत होल्डर म्हणाला की, “मला वाटते भारताविरुद्धची मालिका एक मोठी मालिका असणार आहे. माझ्या हिशोबाने भारत जगातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू संघ आहे आणि त्यांनी सिद्ध केले आहे की, मागच्या काही वर्षांपासून त्यांच्या धरतीवर त्यांना पराभूत करणे सोपे नाहीय. परंतु ही गोष्ट असंभव देखील नाहीय. वेस्ट इंडीजकडे भारताला त्यांच्या घरात पराभूत करण्यासाठी संधी आहे.”
हेही वाचा- विराटने गिफ्ट केला होता फ्लॅट, तर धोनीने बोलावले होते मुंबईला, कोण आहे ही पूजा बिश्नोई? घ्या जाणून