---Advertisement---

भारताशी दोन हात करण्यासाठी वेस्ट इंडिजच्या टी२० संघाची घोषणा, पोलार्डच्या हाती नेतृत्त्व; बघा संपूर्ण टीम

West-Indies
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (INDvsWI) संघात फेब्रुवारी महिन्यात ३ सामन्यांची वनडे आणि ३ सामन्यांची टी२० मालिका (T20 Series) खेळली जाणार आहे. या मर्यादित षटकांच्या मालिकांच्या दौऱ्यासाठी लवकरच पाहुणा वेस्ट इंडिजचा संघ भारतात येईल. या मालिकांसाठी यजमान भारतीय संघाने आपल्या वनडे आणि टी२० संघांची घोषणा केली आहे. तर वेस्ट इंडिजनेही वनडे संघ घोषित केला होता. यानंतर आता शनिवारी (२९ जानेवारी) त्यांनी १६ सदस्यीय टी२० संघ जाहीर (West Indies Squad) केला आहे. 

वेस्ट इंडिजच्या टी२० संघाची धुरा कायरन पोलार्ड (Kieron Pollard) याच्या हाती सोपवण्यात आली आहे. तर निकोलस पूरन याला उपकर्णधार बनवले गेले आहे. वेस्ट इंडिजच्या संघात अधिकतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकांमध्ये संघाचा भाग असलेल्या शिलेदारांनाच संघात कायम ठेवण्यात आले आहे. तसेच वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू जेसन होल्डर हादेखील या संघाचा भाग आहे.

व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये

भारत आणि वेस्ट इंडिज संघात वनडे मालिकेनंतर १६ फेब्रुवारीपासून टी२० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे १८ आणि २० फेब्रुवारी रोजी पार पडेल. हे तिन्ही सामने कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहेत.

वेस्ट इंडिजचा टी२० संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन (उपकर्णधार), फॅबियन ऍलेन, डॅरेन ब्रावो, रोस्टेन चेज, शेल्डन कॉटरेल, डोमिनिक ड्रेक, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, ब्रेंडन किंग, रोवमन पॉवेल, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, कायल मेयर्स, हेडन वाल्श जूनियर

भारताचा टी२० संघ – 
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), वेंकटेश अय्यर, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल.

हेही वाचा- “आमच्या कमाईचा हा एकमेव मार्ग”; रणजी ट्रॉफी विजेत्या कर्णधाराने सांगितले विदारक सत्य

तसेच टी२० संघाबरोबरच उभय संघांनी वनडे संघही जाहीर केले आहेत. ६ फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेची सुरुवात होणार आहे. तर ११ फेब्रुवारीला ही मालिका संपेल. भारत आणि वेस्ट इंडिजमधील तिन्ही वनडे सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होतील.

भारताचा वनडे संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, रिषभ पंत (यष्टिरक्षक), दीपक चाहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि आवेश खान.

वेस्ट इंडिजचा वनडे संघ-
कायरन पोलार्ड (कर्णधार), फॅबियन ऍलेन, एनक्रुमाह बोनर, डॅरेन ब्रावो, शमारह ब्रूक्स, जेसन होल्डर, शाय होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, निकोलस पूरन, केमार रोच, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, हेडन वाल्श जूनियर

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल मेगा लिलावात ‘या’ दमदार खेळाडूंना मिळणार नाही भाव; जाणून घ्या कारण

मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सच्या रणनितीचा झाला खुलासा; वाचा सविस्तर

PHOTO: केवळ क्रिकेटच नाहीतर ‘या’ खेळाचाही उस्ताद आहे संजू सॅमसन; पाहा व्हायरल फोटो

हेही पाहा-

काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये । World Cup Semi Final 2019

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---