भारत आणि वेस्ट इंडीज (IND VS WI) यांच्यात सध्या मायदेशातील एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. एकदिवसीय मालिकेत कोरोना महामारीच्या कारणास्तव प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश नाकरण्यात आला आहे. एकदिवसीय मालिकेनंतर उभय संघात टी-२० मालिका खेळली जाणार आहे. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (CAB) उभय संघातील टी-२० मालिकेत प्रेक्षकांना प्रवेश दिला जावा, अशी मागणी बीसीसीआयकडे केली आहे.
उभय संघातील एकदिवसीय मालिका अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जात आहे, तर टी-२० मालिका कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियवर आयोजित केली गेली आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील टी२० मालिकेच्या पार्श्वभूमीवर कॅब आणि बीसीसीआय यांच्यात चर्चा पार पडली आहे.
सदस्यांना सांगितले गेले की, “क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालने (कॅब) बीसीसीआयकडे मागणी केली आहे की, आयोजनाच्या ठिकाणी प्रेक्षकांना परवानगी दिली जावी. बीसीसीआयच्या प्रतिक्रियेची वाट आहे. कॅबला अजूनही सकारात्मक उत्तराची अपेक्षा आहे.”