वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असलेला भारतीय संघ तीन सामन्यांची वनडे आणि पाच सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. यातील पहिला वनडे सामना भारताने ३ धावांनी जिंकला आहे. तर वेस्ट इंडिज विरुद्ध भारत दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात असल्याने विधान भारताच्या माजी क्रिकेटपटूने केले आहे.
पहिल्या वनडे सामन्यामध्ये कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan)आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९९ चेंडूत ९७ धावांची भागीदारी केली. यावेळी धवनने ९७ धावा, शुबमन गिलने ६४ धावा आणि अय्यरने ५७ धावा केल्याने भारताने ३०८ धावसंख्या उभारली. तसेच धवनने गिलसोबत पहिल्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी रचली होती.
अय्यरला इंग्लंड दौऱ्यात फार कमी संधी मिळाल्या होत्या. त्याला इंग्लंडच्या दौऱ्यातील शेवटच्या दोन सामन्यात बाकावर बसावे लागले होते. तो पहिल्या सामन्यात अंतिम अकरामध्ये होता, कारण त्यावेळी विराट कोहली (Virat Kohli) संघात नव्हता. मात्र पुढील दोन सामन्यात कोहलीचे संघात पुनरागमन झाल्याने तो पुन्हा बाहेर झाला. पहिला वनडे सामना भारताने १० विकेट्सने जिंकला होता. यामुळे त्याला फलंदाजी करण्याची संधी मिळालीच नाही.
सध्या अय्यर क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये खेळत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला निवडकर्ते अधिक पसंती देत आहेत. इंग्लंड दौऱ्यात असेच काहीसे चित्र दिसले आहे. त्या सामन्यांमध्ये अय्यरच्या तुलनेत सूर्यकुमारला अधिक संधी देण्यात आल्या. यामुळे भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर म्हणतो, “अय्यर त्याचे अंतिम अकरातील स्थान गमावण्याच्या मार्गावर आहे.”
इंग्लंडच्या दौऱ्यात श्रेयसने एक कसोटी, वनडे आणि टी२० असे तीनच सामने खेळले. दुसरीकडे सूर्यकुमारने संपूर्ण वनडे आणि टी२० मालिका मिळून सहा सामने खेळले.
क्रिकेटमध्ये वातावरण बदलत चालले आहे. “अय्यरसारख्या खेळाडूला संघातील आपले स्थान गमावण्याची वेळ आली आहे. त्यातच तो आखूड चेंडूवर अपयशी ठरत आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध त्याने एक चांगले काम केले त्याने ते आखूड चेंडू सोडले. गोलंदाजांला एका षटकामध्ये दोन बाउंसर टाकण्याची परवाणगी आहे. ते योग्यपणे खेळणे फलंदाजाची जबाबदारी असते. त्याने तो खेळला नाही तर तो सोडून देणे अधिक चांगले,” असेही आगरकरने पुढे म्हटले आहे.
भारतीय संघात २०१७मध्ये पदार्पण करणाऱ्या अय्यरने आतापर्यंत ५ कसोटी, २८ वनडे आणि ४२ टी२० सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने २ शतके आणि १९ अर्धशतके केली आहेत.
तसेच वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा वनडे पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हलवर खेळला जाणार आहे. हा सामना जिंकत भारताला वेस्ट इंडिज विरुद्ध लागोपाठ १२ मालिका जिंकण्याचा इतिहास रचण्याची संधी आहे. तर २००७पासून सुरू झालेल्या या मालिका विजयाचा प्रवास यजमान संंघ खंडीत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो रिषभ पंत नाही, दोघांत खूप अंतर’, खराब प्रदर्शनावरुन पाकिस्तानी दिग्गजाचा सॅमसनवर निशाणा
जडेजा म्हणतोय ‘धवनला भारतीय संघात घेऊच नका’, धिम्या खेळीवरून साधला थेट निशाणा
भारताचा कर्णधार रोहित शर्मा कुटुंबासोबत मग्न, पत्नी रितीकासोबतचे फोटो केले शेअर