टी20 विश्वचषक 2022मधील सुपर 12 फेरीतील शेवटचे 3 सामने रविवारी (दि. 5 नोव्हेंबर) खेळले जाणार आहेत. यातील तिसरा सामना भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघात खेळला जाणार आहे. हा सामना मेलबर्न येथे पार पडणार आहे. भारतीय संघाला उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावा लागेल.
भारतीय संघाबद्दल बोलायचं झालं, तर संघाने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत. यामधील 3 सामन्यात भारताच्या पदरात यश पडले आहे. मात्र, भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताकडून विराट कोहली याने 3 अर्धशतके साकारली आहेत. यासोबतच तो विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही आहे. दुसरीकडे, गोलंदाजीत अर्शदीप सिंग याने 9 विकेट्स चटकावल्या आहेत. तसेच, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या हेदेखील शानदार फॉर्ममध्ये आहेत.
याव्यतिरिक्त झिम्बाब्वे संघाबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघ्या 1 धावेने विजय मिळवला होता. तसेच, त्यांनी बांगलादेशविरुद्धही शानदार प्रदर्शन केले होते. अशात भारतीय संघाला या सामन्यात सावध राहावे लागेल.
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघ आमने सामने आकडेवारी
भारत विरुद्ध झिम्बाब्वे संघाी आमने-सामने आकडेवारी पाहिली, तर दोन्ही संघ 7 वेळा एकमेकांसमोर आले आहेत. यामध्ये भारतीय संघाने 5 वेळा विजय मिळवला आहे, तर उर्वरित 2 सामन्यात झिम्बाब्वे संघाने विजय मिळवला आहे. भारतीय संघाला 2015मध्ये 10 धावांनी आणि 2016मध्ये 2 धावांनी झिम्बाब्वेकडून पराभूत व्हावे लागले होते.
वनडे विश्वचषकात भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 9 सामने खेळले आहेत. त्यापैकी 8 सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तर झिम्बाब्वेला एक सामना आपल्या नावावर करण्यात यश आले होते.
कधी आणि कुठे होणार सामना?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना रविवारी (दि. 06 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाईल.
कुठे होणार प्रक्षेपण?
भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामन्याचे लाईव्ह प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स टीव्ही चॅनेलवर केले जाईल. याव्यतिरिक्त सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग डिझ्नी प्लस हॉटस्टारवरही केले जाईल.
भारतीय संघ
केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, हर्षल पटेल, दीपक हुड्डा, रिषभ पंत.
झिम्बाब्वे संघ
वेस्ले मधवेरे, क्रेग एर्विन (कर्णधार), रेजिस चकबवा (यष्टीरक्षक), सीन विलियम्स, सिकंदर रजा, मिल्टन शुंबा, रायन बर्ल, ल्यूक जोंगवे, रिचर्ड नगारवा, तेंदई चतरा, ब्लेसिंग्स मुजरबानी, वेलिंग्टन मसाकाद्जा, टोनी मुनयोंगा, ब्रॅड इव्हान्स, क्लाइव्ह मडांडे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फ्लॉप ठरूनही कार्तिकला मिळाला भारतीय दिग्गजाचा भक्कम पाठिंबा; म्हणाला, ‘इतर खेळाडूही फ्लॉप…’
श्रीलंकेला नमवत इंग्लंड सेमी-फायनलमध्ये! यजमान ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात