---Advertisement---

पाकिस्तानचं काही खरं नाही! भारतीय महिला फलंदाजाने 56 चेंडूत चोपल्या 91 धावा, षटकारांचाही पाडला पाऊस

On: गुरूवार, फेब्रुवारी 9, 2023 1:51 PM
Richa-Ghosh
---Advertisement---

आयसीसी महिला टी20 विश्वचषक 2023 स्पर्धेला येत्या 10 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ 12 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान महिलांविरुद्ध भिडणार आहे. त्यापूर्वी संघांमध्ये सराव सामने खेळवण्यात आले. 10वा सराव सामना भारतीय महिला विरुद्ध बांगलादेश महिला संघात पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने 52 धावांनी शानदार विजय मिळवला. या सामन्यात भारतीय संघाची यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष हिने वादळी फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ऋचाने तिचा इरादा स्पष्ट केला आहे की, पाकिस्तानविरुद्ध ती जबरदस्त फलंदाजी करणार आहे.

या सामन्यात भारतीय महिला (India Women) संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताने फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 183 धावांचा पाऊस पाडला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेश महिला (Bangladesh Women) संघाला 8 विकेट्स गमावत 131 धावाच करता आल्या. त्यामुळे भारताने हा सामना 52 धावांनी खिशात घातला.

बांगलादेशकडून फलंदाजी करताना कर्णधार निगर सुलताना हिने सर्वाधिक धावा केल्या. तिने 36 चेंडूत 40 धावा केल्या. यामध्ये 1 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश होता. तिच्याव्यतिरिक्त सलामीवीर मुर्शिदा खातून हिने (32), शमिमा सुलताना (15), आणि रितू मोनी (11) यांनीही दोन आकडी धावसंख्येचं योगदान दिले. याव्यतिरिक्त एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्या करू शकला नाही.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना देविका वैद्य हिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 3 षटके गोलंदाजी करताना 21 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. याव्यतिरिक्त राजेश्वरी गायकवाड, अंजली सर्वणी, दीप्ती शर्मा, राधा यादव आणि शफाली वर्मा यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना या सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. भारताने पहिले 3 विकेट्स अवघ्या 35 धावांवर गमावल्या होत्या. यास्तिका भाटिया 10, शफाली वर्मा 9 आणि हरलीन देओल 10 धावांवर तंबूत परतल्या. यानंतर चौथ्या विकेटसाठी ऋचा घोष (Richa Ghosh) आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी 92 धावांची भागीदारी रचली. यामध्ये ऋचाच्या नाबाद 91 (3 चौकार, 9 षटकार) आणि जेमिमाच्या 45 धावांचा समावेश होता. तसेच, पूजा वस्त्राकर हिने नाबाद 13 धावांचे योगदान दिले.

यावेळी बांगलादेशकडून गोलंदाजी करताना नाहिदा अक्तर हिने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त जहानारा आलम, सलमा खातून, मरुफा अक्तर यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

धावांचा पाऊस पाडणाऱ्या ऋचा घोष हिच्याबद्दल बोलायचं झालं, तर ती नुकत्याच शफाली वर्मा हिच्या नेतृत्वात आयसीसी महिला 19 वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा भाग होती. (ind w vs ban w t20 world cup 2023 india beat bangladesh by 52 runs)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जडेजाचे दमदार पुनरागमन, चेंडू हातात घेताच तीन ऑस्ट्रेलियन फलंदाजांना धाडले तंबूत
शमीच्या भेदक गोलंदाजीपुढे वॉर्नर ढेर, चेंडू असा की, स्टंपही गेला उडून; व्हिडिओ पाहाच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---