INDWvsENGW Test: गुरुवारपासून (दि. 14 डिसेंबर) भारतीय महिला विरुद्ध इंग्लंड महिला संघात नवी मुंबईच्या डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी मैदानावर एकमेव कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यात दुसऱ्या दिवशी भारताचा पहिला डाव 428 धावांवर संपुष्टात आला. भारताने दुसऱ्या दिवशी 18 धावा जोडल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंड संघाचा पहिला डाव 35.3 षटकात 136 धावांवरच संपुष्टात आला. यावेळी भारताकडून दीप्ती शर्मा हिने विकेट्सचे पंचक पूर्ण केले.
इंग्लंडचा पहिला डाव
इंग्लंडच्या पहिल्या डावाची सुरुवात तितकी चांगली राहिली नाही. सोफिया डंकले आणि कर्णधार हीदर नाईट दोघीही प्रत्येकी 11 धावा करून बाद झाल्या. डंकलेला रेणुकाने त्रिफळाचीत बाद केले. तसेच, हीदर पूजा वस्त्राकर हिच्या चेंडूवर पायचीत बाद झाली. त्यानंतर टॅमी ब्यूमोंट आणि नॅट सायव्हर-ब्रंट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी रचली. ब्यूमोंट 10 धावा करून बाद झाली. पुढे दीप्ती शर्मा (Deepti Sharma) हिने डॅनियल वाएटला 19 धावांवर खेळत असताना झेलबाद केले. तसेच, दीप्तीने इंग्लंडच्या डावातील 30व्या षटकात 2 विकेट्स घेतल्या. तिने चौथ्या चेंडूवर एमी जोन्सला शेफाली वर्मा (Shafali Verma) हिच्या हातून झेलबाद केले. जोन्स 12 धावाच करू शकली. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर सोफी एक्लेस्टोनच्या दांड्या उडवल्या. तिला खातेही खोलता आले नाही.
पुढे इंग्लंडची सातवी विकेट ब्रंटच्या रूपात पडली. सर्वाधिक 59 धावा करणाऱ्या ब्रंटला स्नेह राणाने त्रिफळाचीत बाद केले. तसेच, इंग्लंडची आठवी विकेटही राणानेच घेतली. तिने चार्ली डीनला पायचीत बाद करून शून्यावर तंबूत धाडले. पुढील दोन विकेट्स दीप्ती शर्मा हिने घेतल्या. तिने आधी केट क्रॉसला 1 धावेवर स्वत:च झेल घेऊन बाद केले. तसेच, लॉरेन फिलरला 5 धावांवर खेळत असताना त्रिफळाचीत बाद केले.
भारताची गोलंदाजी
इंग्लंडच्या डावात भारताकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्मा चमकली. तिने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. तिने 5.3 षटके गोलंदाजी करताना 7 धावा खर्चून 5 विकेट्स घेतल्या. तिच्याव्यतिरिक्त स्नेह राणाने 2 विकेट्स घेतल्या. तसेच, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनीही प्रत्येकी 1 विकेट आपल्या नावे केली.
भारताची दमदार फलंदाजी
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण करणारी शुभा सतीश चमकली. तिने सर्वाधिक 69 धावा केल्या. तसेच, जेमिमा रॉड्रिग्जने 68, दीप्ती शर्माने 67 आणि यास्तिका भाटिया हिने 66 धावांची अर्धशतकी खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर हिने 49 धावा केल्या. याव्यतिरिक्त स्नेह राणाने 30, शेफाली वर्माने 19, स्मृती मंधानाने 17 आणि पूजा वस्त्राकरने नाबाद 10 धावांची खेळी केली. रेणुकाला फक्त 1 धावेवर समाधान मानावे लागले. भारताने चार खेळाडूंच्या अर्धशतकांच्या जोरावर 104.3 षटकात सर्व विकेट्स गमावत पहिल्या डावात 428 धावा केल्या.
भारताने इंग्लंडला 136 धावांवर सर्वबाद करत 292 धावांची आघाडी घेतली. तसेच, दुसऱ्या डावाची सुरुवात करण्यासाठी शेफाली वर्मा आणि स्मृती मंधाना क्रीझवर उतरल्या. 3 षटकांच्या खेळापर्यंत भारताने 12 धावा केल्या. यावेळी दोघींनी नाबाद अनुक्रमे 0 आणि 12 धावा केल्या होत्या. (ind w vs eng w 1st test india women vs england women england all out on 136 runs day 2 match scorecard)
हेही वाचा-
T20 World Cup 2024: सातासमुद्रापार आमने-सामने येणार भारत-पाकिस्तान, ‘या’ शहरात रंगणार सामना; लगेच वाचा
अर्रर्र! आगामी टी20 लीगमध्ये कुठल्याच संघाने विश्वास न दाखवल्याने पाकिस्तानी खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती