भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात (ENGvsIND) इतिहास रचला आहे. शनिवारी (24 सप्टेंबर) झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात भारताने 16 धावांनी विजय मिळवला आहे. यामुळे भारताने तीन सामन्यांची वनडे मालिका 3-0 अशी जिंकली आहे. भारतीय महिलांनी प्रथमच इंग्लंडला इंंग्लंडमध्ये वनडेत क्लीन स्वीप दिले आहे, मात्र भारताचा हा मालिका विजय आणखी एका कारणाने चर्चेत आला आहे. दीप्ति शर्मा हिने केलेले धावबाद विवादास्पद ठरले असल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना हरमनप्रीत कौर तिच्या मदतीला पुढे आली आहे.
लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारताची फिरकीपटू दीप्ति शर्मा (Deepti Sharma) हिने उत्तम गोलंदाजी केली. तिने चार्लोट डीन हिला धावबाद करत संघाला विजय मिळवून दिला. तिच्या या कृतीने इंग्लंडच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने तिची बाजू घेतली आहे. हरमनप्रीतने सामन्यानंतर बोलताना म्हटले की दीप्तिने नियमांच्या विरुद्ध जाऊन कोणचीही चूक केलेली नाही.
मंकडींगवर बोलताना हरमनप्रीत म्हणाली, “हा खेळाचा भाग आहे. मला नाही वाटत आम्ही काही नवीन केले. यावरून आपल्याला दिसून येते की गोलंदाज कशाप्रकारे तप्तर राहतो. मी माझ्या खेळाडूंचे समर्थन करेल, तिने नियमांच्या विरुद्ध जाऊन काही केले नाही. शेवटी एक विजय हा विजयच आहे आणि आम्ही तो घेणार आहोतच.”
सामन्यात जेव्हा इंग्लंडची फलंदाजी सुरू होती. 44व्या षटकात दीप्ति गोलंदाजी करत होती तेव्हा चार्लोट डीन नॉन स्ट्राईकर होती. चेंडू टाकताना दीप्तिने चार्लोटला मंकडींगचा इशारा केला होता. या घटनेचा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला आहे. चार्लोटने 80 चेंडूत 5 चौकाराच्या सहाय्याने 47 धावा केल्या, मात्र ती ज्याप्रकारे बाद झाली याचे तिला खूप दु:ख झाले.
https://twitter.com/kyakarungimain/status/1573727381701136386?s=20&t=AIXaM1Bj0TIPArj6r0__OA
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना स्म्रीती मंधाना (50) आणि दीप्तिच्या नाबाद 68 धावांच्या जोरावर 10 विकेट्स गमावत 169 धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंड 153 धावांवरच गारद झाला. भारताकडून रेणुका सिंगने 4, राजेश्वरी गायकवाड आणि झुलन गोस्वामी यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तसेच दीप्तिने एक विकेट घेतली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसी) मंकडींगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. हा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू केला जाणार आहे. त्यानुसार नॉन स्ट्राईकरचा फलंदाज गोलंदाजाने चेंडू टाकण्याआधी क्रिजच्या बाहेर जात असेल, अशावेळी गोलंदाजाने त्या फलंदाजाला बाद केले तर ते अनाधिकृत ठरवले जात होते. आता त्याला धावबाद म्हटले जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-