संपूर्ण भारतभरात ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. संपूर्ण भारतात हा दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा केला जातो. अशातच साता समुद्रापार असलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी देखील ७५ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या जल्लोषात साजरा केला आहे. ज्याचा व्हिडिओ भारतीय संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.
सध्या भारत विरुध्द इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर सुरू आहे.अशातच या सामन्याचा चौथा दिवस (१५ ऑगस्ट) सुरू होण्यापूर्वी भारतीय संघातील खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या सदस्यांनी लॉर्ड्समधील त्यांच्या हॉटेल बाहेर ध्वजारोहण केले.
भारतीय संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये भारतीय संघातील खेळाडू, सपोर्ट स्टाफमधील सदय आणि खेळाडूंच्या कुटुंबातील सदस्य एकत्र असल्याचे आढळून आले. तसेच ध्वजारोहण करण्याचा मान भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला देण्यात आला होता. ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी एक सुरात राष्ट्रगीत गायले.(Independence day celebrated by Indian cricket team in England watch video)
On the occasion of India's Independence Day, #TeamIndia members came together to hoist the flag 🇮🇳 🙌 pic.twitter.com/TuypNY5hjU
— BCCI (@BCCI) August 15, 2021
दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी (१४ ऑगस्ट) इंग्लंड संघाने पहिल्या डावात सर्वबाद ३९१ धावा केल्या होत्या. तसेच २७ धावांची आघाडी घेतली होती. त्यामुळे सामन्यातील चौथ्या दिवशी (१५ ऑगस्ट) भारतीय संघातील फलंदाज जास्तीत जास्त धावा करून इंग्लंड संघासमोर मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असतील.
या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक १२९ धावांची खेळी केली होती. तर रोहित शर्माने ८३ आणि कर्णधार विराट कोहलीने ४२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले होते.
या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्ण संधी होती. परंतु, सामन्याच्या शेवटच्या दिवशी पावसाचे आगमन झाल्यामुळे हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटसाठी काही पण! दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहिलेला अय्यर ‘या’ कारणामुळे एकटाच पोहोचला युएईत
डीआरसाठी आख्खा संघ जमतो, इकडं हसून माझं पोट दुखतं; इंग्लंडच्या दिग्गजाकडून भारताची थट्टा