आज (15 ऑगस्ट 2023) भारत देशाचा 76 वा स्वातंत्र्यदिन. भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवसआधी (१४ ऑगस्ट) पाकिस्तान देशाचाही स्वातंत्र्य दिवस पार पडला. भारत आणि पाकिस्तान हे देश एकमेकांचे शेजारी आहेत. परंतु अनेक कारणास्तव दोन्ही देशांमधील संबंध चांगले राहिलेले नाहीत. अगदी क्रिडा क्षेत्रातही भारत-पाकिस्तान शत्रूत्वाचे पडसाद उमटले आहेत. दोन्ही देशांचे क्रिकेटपटू आमने सामने आले म्हणजे घमासान पाहायला मिळते.
परंतु एकदा हे वैर बाजूला ठेवत भारतीय महिला क्रिकेटपटूंनी पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारूफ हिच्या मुलीसोबत खेळताना दिसल्या होत्या. त्यांच्या या कृतीचे जगभरातून कौतुक झाले होते. त्याचाच हा किस्सा.
काय होता तो किस्सा?
महिला वनडे विश्वचषक स्पर्धा 2022 मध्ये (ICC Women’s World Cup 2022) 30 वर्षांची बिस्माह मारूफ (Bismah Maroof) पाकिस्तान महिला संघाचे नेतृत्व करत होती. हा सामना झाल्यानंतर मरूफ पत्रकार परिषदेत व्यस्त होती. यावेळी पाकिस्तानच्या सपोर्ट स्टाफमधील सदस्या मरूफच्या मुलीला म्हणजेच फातिमाला सांभाळत होत्या. तेव्हा भारतीय महिला क्रिकेटपटू फातिमाला (Indian Players Played With Fatima) भेटण्यासाठी गेल्या होत्या.
This is so wholesome. Indian women cricket team players gathered around Bismah Maroof's daughter showering love on her. ❤️#TeamPakistan | #CWC22 | #INDvPAK pic.twitter.com/Yw9P50G7OV
— a. (@lapulgaprop_) March 6, 2022
हरमनप्रीत कौर, स्म्रीती मंधाना, यष्टीरक्षक ऋचा घोष, शेफाली वर्मासह बऱ्याचशा भारतीय खेळाडू फातिमासोबत खेळताना दिसल्या होत्या. त्यांनी फातिमासोबत सेल्फीही काढला होता. आयसीसीने त्यांच्या या क्षणाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्याला लाखोंच्या घरात लाईक्स मिळाल्या होत्या.
Little Fatima's first lesson in the spirit of cricket from India and Pakistan 💙💚 #CWC22
📸 @TheRealPCB pic.twitter.com/ut2lCrGL1H
— ICC (@ICC) March 6, 2022
सामन्यादरम्यानही भारतीय खेळाडू फातिमासोबत खेळताना दिसल्या होत्या. एकता बिष्ट सामन्यादरम्यान फातिमासोबत खेळताना दिसली होती. फातिमाही एकतासोबत खेळताना हसताना दिसली. भारताची अनुभवी गोलंदाज झूलन गोस्वामी हिनेही फातिमासोबत चांगला वेळ घालवला होता.
What a lovely moment! Cricket has boundaries on the field, but it breaks them all off the field.
Sport unites!#CWC22 pic.twitter.com/isgALYeZe1
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 6, 2022
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो फॉर्मात परतला तर…’ पाकिस्तानच्या माजी दिग्गजाने आपल्याच संघाला दिलाय इशारा
एका सुवर्ण युगाचा अंत! ‘बिग बुल’च्या निधनाने हळहळले भारतीय दिग्गज
झिम्बाब्वे दौरा जिंकण्यासाठी राहुलकडे आहेत ‘हे’ ३ हुकमी एक्के! कोणत्याही क्षणी निकाल बदलण्यात पटाईत