हर्शल गिब्स आणि सनथ जयसूर्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसणार नाहीत. हर्शल गिब्स आणि सनथ जयसूर्या यांच्या जागी शेन वॉटसन आणि डॅनियल व्हिटोरी यांचा वर्ल्ड जायंट्स संघात समावेश करण्यात आला आहे. भारत महाराज आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यातील हा सामना १६ सप्टेंबरला ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सौरव गांगुली भारतीय महाराजा संघाचा कर्णधार असेल
भारत महाराजाविरुद्धच्या सामन्यात हर्शल गिब्स आणि सनथ जयसूर्या वर्ल्ड जायंट्स संघाचा भाग नसल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. विशेष म्हणजे लिजेंड्स लीग क्रिकेट लीगचा हा दुसरा हंगाम असेल. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली भारत महाराजा संघाचा कर्णधार असेल, तर इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गन वर्ल्ड जाएंट्स संघाचा कर्णधार असेल. या लीगमध्ये १० वेगवेगळ्या देशांचे क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. त्याचवेळी, लिजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले की, “आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे करत आहोत हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
भारत महाराजा-
सौरव गांगुली (कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंत, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रज्ञान ओझा, अजय जडेजा, आरपी सिंह, जोगिंदर शर्मा.
वर्ल्ड जाएंट्स-
इऑन मॉर्गन (कर्णधार), लेंडल सिमन्स, शेन वॉटसन, जॅक कॅलिस, डॅनियल व्हिटोरी, मॅट प्रायर, नॅथन मॅक्युलम, जॉन्टी रोड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसाकादझा, मशरफे मोर्तझा, असगर अफगाण, मिचेल जॉन्सन, ब्रेट ली, केविन ओब्रायन, दिनेश रामदिन.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सूर्यकुमारने चहलच्या बायकोसोबत शेअर केला फोटो, कॅप्शन लिहीत ‘युझी’ला केलं ट्रोल
आशिया कपमध्ये पाकिस्तानच्या ‘या’ तिकडीपासून टीम इंडियाला धोका
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव: कपिल देवचा कॅच, गांगुलीचे जर्सी सेलेब्रेशन, धोनीचा सिक्स अन् बरचं काही