श्रीलंका येथे होत असलेल्या इमर्जिंग एशिया कपमध्ये शुक्रवारी (21 जुलै) इंडिया ए आणि बांगलादेश ए यांच्या दरम्यान उपांत्य फेरीचा दुसरा सामना पार पडला. भारतीय संघाने बांगलादेश संघासमोर विजयासाठी केवळ 212 धावांचे आव्हान ठेवले होते. बांगलादेश संघ एक वेळ तीन बाद 100 अशा सुस्थितीत असताना निशांत सिंधू यांनी केलेल्या घातक गोलंदाजीचा जोरावर भारतीय संघाने 51 धावांनी विजय मिळवला. आता स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होईल.
या सामन्यात बांगलादेशच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी योग्य ठरवत भारताची अवस्था एक वेळ 4 बाद 90 अशी केली होती. त्यानंतर भारतीय कर्णधार यश धूलने 85 चेंडूंचा सामना करताना सहा चौकारांच्या मदतीने 66 धावांची खेळी केली. त्यामुळे भारतीय संघाने 211 पर्यंत मजल मारली.
या धावांचा पाठलाग करत असताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी 70 धावांची सलामी दिली. त्यानंतर आणखी 30 धावा त्यांचे दोन गडी बाद झाले. बांगलादेश संघ या सामन्यात आघाडीवर वाटत असतानाच फिरकीपटू निशांत सिंधू याने आपल्या फिरकीचे जाळे विणले. त्याने पाच तर मानव सुतार याने तीन बळी मिळवत बांगलादेशच्या डावाची घसरगुंडी घडवून आणली. बांगलादेशचा डाव केवळ 160 संपुष्टात आणत त्यांनी भारतीय संघाला 51 धावांनी विजय मिळवून दिला.
रविवारी होणाऱ्या भारतीय संघाचा सामना पाकिस्तान विरुद्ध होईल.
(India A Beat Bangladesh A In Emerging Asia Cup Semi Final By 51 Runs Nishant Sindhu Shines)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: त्रिनिदादमध्ये विराट पर्व! झळकावले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 76 वे शतक
बॅडलक! बेअरस्टोला शतकासाठी एक धाव हवी असताना गेली शेवटची विकेट, इंग्लंडची भलीमोठी आघाडी