भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये येत्या २५ नोव्हेंबर पासून कसोटी मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर पार पडणार आहे. तर दुसरीकडे भारतीय अ संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. भारत अ आणि दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही संघांमध्ये अनधिकृत कसोटी सामन्याला प्रारंभ झाला आहे. या सामन्यातील पाहिल्या दिवशी भारतीय गोलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत.
या दौऱ्यावर भारतीय संघाचे कर्णधारपद प्रियांक पांचालकडे देण्यात आले आहे. या सामन्यात भारतीय अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. गोलंदाजी करताना भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. कारण दक्षिण आफ्रिका अ संघाचे दोन फलंदाज अवघ्या १४ धावांवर माघारी परतले होते.
परंतु, त्यानंतर पिटर मलानने नाबाद १५७ आणि डी जॉर्जीने ११७ धावांची खेळी केली. या दोघांमध्ये २१७ धावांची भागीदारी झाली. पहिल्या दिवसाच्या समाप्ती पर्यंत दक्षिण आफ्रिका अ संघाला ३ बाद ३४३ धावा करण्यात यश आले होते.
नवदीप सैनीची चांगली सुरुवात
वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने दुसऱ्याच चेंडूवर सलामीवीर फलंदाज सारेल इर्वीला कृष्णप्पा गौतमच्या हातून झेलबाद करत माघारी धाडले. त्यानंतर रेनार्ड वान तोंडरला देखील पायचीत करत माघारी धाडले होते.
भारतीय संघातील १५० च्या गतीने गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिकला एक गडी बाद करता आला. तर फिरकीपटू कृष्णप्पा गौतम, राहुल चाहर आणि बाबा अपरिचित हे पूर्णपणे फ्लॉप ठरले. राहुल चाहरने १९ षटक गोलंदाजी करत ७५ धावा खर्च केल्या. भारतीय गोलंदाजांना ५७ षटकांपर्यंत गडी बाद करण्यात अपयश आले होते. उमरान मलिकने डी जॉर्जीला बाद करत भागीदारी तोडली, पण त्यानंतर स्मिथने आपल्या कर्णधाराला चांगली साथ दिली. मलानने आतापर्यंत २५७ चेंडूंचा सामना करत १८ चौकार मारले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
कानपूरच्या खराब प्रॅक्टिस पीचमुळे द्रविड-रहाणे नाराज, खेळाडूंना जखमा होण्याचा धोका; अखेर…
दमदार कामगिरीनंतरही ‘या’ तिघांवर झाला अन्याय; कसोटी संघात नाही मिळाली जागा