भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यात सध्या दोन अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी (31 ऑक्टोबर) भारतीय संघ 107 धावांवर ऑलआऊट झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी टीम इंडियानं जोरदार कमबॅक केला आहे.
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्या पहिल्या डावात 200 धावांचा टप्पाही गाठू दिला नाही. ऑस्ट्रेलिया ‘अ’ संघाचा पहिला डाव 195 धावांवर आटोपला. असं असूनही कांगारुंकडे सध्या 88 धावांची आघाडी आहे. भारतासाठी वेगवान गोलंदाज मुकेश कुमार सर्वात यशस्वी ठरला. त्यानं पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. याशिवाय प्रसिद्ध कृष्णाला तीन विकेट मिळाल्या.
कालच्या 99/4 धावसंख्येवंरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाला 124 वर पाचवा धक्का बसला. कूपर कोनोली 60 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. मुकेश कुमारनं त्याची विकेट घेतली. जोश फिलिपे केवळ 4 धावा करून माघारी परतला. कर्णधार नॅथन मॅक्स्वीनीनं 131 चेंडूत 39 धावा केल्या. 177 च्या स्कोरवर ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 62.4 षटकं खेळून 195 धावांवर ऑलआऊट झाला.
एकवेळ मुकेश कुमारला भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा महत्त्वाचा सदस्य मानलं जात होतं. मात्र आता तो कोणत्याही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा भाग नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. टीम मॅनेजमेंटनं त्याच्या जागी आकाशदीप आणि हर्षित राणा यांना पसंती दिली आहे.
भारतीय संघात निवड न झाल्यानंतरही मुकेश देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं आपल्या गोलंदाजीचा जलवा दाखवत आहे. आता त्यानं ऑस्ट्रेलियामध्ये देखील आपल्या गोलंदाजीनं कहर केला. जर तो आपल्या कामगिरीत सातत्य ठेवू शकला, तर त्याचा भारतीय संघात लवकरच कमबॅक होऊ शकतो.
हेही वाचा –
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
IND VS NZ; भारतासाठी सुटकेचा श्वास, किवी संघाचा मॅचविनर खेळाडू मुंबई कसोटीतून बाहेर
रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? या संघाच्या खात्यात 110 कोटींहून अधिक