सध्या न्यूझीलंड ए संघ भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांमध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका नुकतीच चेन्नई येथे पार पडली. संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळलेल्या भारतीय संघाने या मालिकेत वर्चस्व गाजवत पाहुण्या संघाला 3-0 अशी मात दिली. याआधी झालेल्या प्रथमश्रेणी सामन्यांच्या मालिकेतही भारतीय संघाने विजय मिळवला होता. कर्णधार संजू सॅमसन व अष्टपैलू शार्दुल ठाकूर यांनी भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
India A Won by 106 Run(s) #IndAvNzA #IndiaASeries Scorecard:https://t.co/t3JROnJ7Fm
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 27, 2022
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून भारताने आधीच मालिका खिशात घातली होती. या तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज निर्णय घेतला. मात्र, अभिमन्यू ईस्वरन व राहुल त्रिपाठी हे भारतीय सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. त्यानंतर, कर्णधार संजू सॅमसन (54) आणि युवा तिलक वर्मा (50) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही अर्धशतके झळकावली. हे दोघे बाद झाल्यानंतर संघाची छोटीशी घसरगुंडी झाली. अखेरीस अष्टपैलू शार्दुल ठाकूर याने 33 चेंडूवर 51 धावांची आक्रमक खेळी करत भारतीय संघाला 49.3 षटकात सर्वबाद 284 पर्यंत मजल मारून दिली.
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पाहुणा संघ अजिबात झुंज देताना दिसला नाही. सलामीवीर डेन क्लेवर (84) वगळता इतर फलंदाजांनी अक्षरशा नांग्या टाकल्या. मायकल रिपनने 29 धावांचे योगदान दिले. या मालिकेत प्रथमच संधी देण्यात आलेल्या राज अंगद बावाने सर्वाधिक 4 बळी आपल्या नावे केले. राहुल चहर व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेत त्याला साथ दिली. भारतासाठी कर्णधार संजू सॅमसन सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. तर कुलदीप यादवने सर्वाधिक बळी मिळवले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंड ए विरुद्ध संजू सॅमसनची ‘कॅप्टन्स इनिंग’;तिलक, शार्दुलचीही चमकदार फलंदाजी
अर्जुन तेंडुलकरचा युवराज सिंगच्या वडीलांसोबत भांगडा डान्स, व्हिडीओ व्हायरल
असा भारतीय क्रिकेटर ज्याला चक्क पाकिस्तानच्या मुलींनी केले होते प्रपोज