हॉंगकॉंग येथे झालेल्या महिला इमर्जिंग आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात विजय मिळवला. बांगलादेश विरुद्ध झालेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने 32 धावांनी विजय संपादन करत ट्रॉफी उंचावली. अष्टपैलू श्रेयंका पाटील हिने अंतिम सामन्यात 4 बळी मिळवत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले.
𝙏𝙝𝙖𝙩 𝙒𝙞𝙣𝙣𝙞𝙣𝙜 𝙁𝙚𝙚𝙡𝙞𝙣𝙜! 👏 👏
Dominant performance from India 'A' as they beat Bangladesh 'A' to clinch the #WomensEmergingTeamsAsiaCup title 🏆
📸 Asian Cricket Council
Scorecard ▶️ https://t.co/KYgPENCXvr#ACC pic.twitter.com/oMvtvylw9k
— BCCI Women (@BCCIWomen) June 21, 2023
हॉंगकॉंग येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. कर्णधार श्वेता सेहरावत व उमा छेत्री यांनी अनुक्रमे 13 व 22 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील वृंदा दिनेश हिने 36 व कनिका आहुजा हिने 30 धावा केल्या. या सर्वांच्या योगदानामुळे भारतीय संघ 127 पर्यंत मजल मारू शकला. बांगलादेशसाठी नाहीदा अख्तर व सुलताना खातून यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना बांगलादेश संघाला भारतीय गोलंदाजांनी स्थिरावू दिले नाही. टिटस साधू व मन्नत कशप या जोडीने त्यांना सुरुवातीलाच धक्के दिले. मन्नतने तीन बळी आपल्या नावे केले. त्यानंतर फिरकीपटू श्रेयंका पाटीलने मधल्या फळीतील चार फलंदाज बांगलादेशचा डाव 96 धावांवर गुंडाळला. या सह भारतीय संघाने ही स्पर्धा आपल्या नावे केली.
(India A Won ACC Womens Emerging Asia Cup 2023 Best Bangladesh In Finals Shreyanka Patil Shines)
महत्वाच्या बातम्या –
MPL 2023मध्ये रत्नागिरी जेट्सचा दुसरा विजयी, सीएसके ‘इतक्या’ धावांनी पराभूत
ऑस्ट्रेलियाने फोडला इंग्लंडच्या ‘बॅझबॉल’चा फुगा! ऍजबस्टन कसोटीत मिळवला थरारक विजय