भारताची टी२० कर्णधार हरमनप्रीत कौरने महिला बीबीएलच्या यंदाच्या हंगामात मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधित्व केले. या संघासाठी तिच्या प्रभावी कामगिरीबद्दल महिला बिग बॅश लीगच्या अधिकृत ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ मध्ये म्हणजे महिला बीबीएलच्या ७ व्या हंगामातील सर्वोत्तम ११ जणांच्या संघात स्थान देण्यात आले. हरमनप्रीतने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीत आपले कर्तृत्व दाखवले.
हरमनप्रीत कौरने आतापर्यंत तीन अर्धशतकांच्या मदतीने ३९९ धावा केल्या. तिचा स्ट्राइक रेट १३५.२५ आणि सरासरी ६६.५ होती. गेल्या आठवड्यात सिडनी थंडरविरुद्ध तिने ८१ धावा केल्या होत्या. तिने स्पर्धेत आतापर्यंत १८ षटकार मारले आहेत. याशिवाय तिने १५ विकेट्सही घेतल्या, ज्यात २२ धावांत ३ ही तिची सर्वोत्तम कामगिरी आहे.
महिला बीबीएल २०२१ च्या सर्वोत्तम संघामध्ये स्थान मिळवणारी हरमनप्रीतही एकमेव भारतीय खेळाडू आहे. तिच्या व्यतिरिक्त, न्यूझीलंडची अष्टपैलू सोफी डिव्हाईन, बेथ मूनी यांचाही या संघात समावेश आहे.
महिला बीबीएल २०२१ स्पर्धेची ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ –
बेथ मुनी (पर्थ स्कॉचर्स), हरमनप्रीत कौर (मेलबर्न रेनेगेड्स), सोफी डिव्हाईन (पर्थ स्कॉचर्स – कर्णधार), जॉर्जिया रेडमायन (ब्रिस्बेन हीट – यष्टीरक्षक); ग्रेस हॅरिस (ब्रिस्बेन हीट), ताहलिया मॅकग्रा (अॅडलेड स्ट्रायकर्स), जेस जोनासेन (ब्रिस्बेन हीट), अमांडा-जेड वेलिंग्टन (अॅडलेड स्ट्रायकर्स), हॅना डार्लिंग्टन (सिडनी थंडर), तायला वेमिनिक (होबार्ट हरिकेन्स), डार्सी ब्राउन (अॅडलेड स्ट्रायकर्स).
महत्त्वाच्या बातम्या –
‘जादूगार’ श्रेयस अय्यरने दाखवलेली पत्त्यांची जादू पाहून मोहम्मद सिराज थक्क, पाहा व्हिडिओ
भारत-पाकिस्तानमध्ये होणार द्विपक्षीय मालिका? ‘या’ ठिकाणी होऊ शकते आयोजन
तमिळनाडूने तिसऱ्यांदा जिंकली सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, पाहा आजपर्यंतचे विजेते