भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) ही मालिका खेळली जात आहे. दरम्यान दोन्ही संघातील तिसरा कसोटी ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर खेळला गेला. पण हा सामना ड्राॅ झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बराच वेळ आपली पकड कायम ठेवली होती, पण अखेरीस सामना वाचवण्यात भारतीय संघाला यश आले. या सामन्याच्या निकालानंतर भारत तिसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र, भारताला पॉईंट टक्केवारीत तोटा झाला आहे.
हा सामना ड्राॅ झाल्यानंतर भारताला एकूण 4 गुण मिळाले आहेत. त्यांचे एकूण गुण आता 114 झाले आहेत. परंतु गुणांच्या टक्केवारीत भारत 57.29 वरून 55.88 पर्यंत घसरला आहे. ऑस्ट्रेलियाची टक्केवारीही 60.71 वरून 58.88 वर घसरली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिका अजूनही अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर कायम आहे. दक्षिण आफ्रिकेची टक्केवारी 63.33 आहे. आफ्रिकेचा संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यापासून फक्त 1 विजय दूर आहे.
भारतीय संघाला ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’च्या फायनलमध्ये स्वबळावर फायनलमध्ये फेरी गाठायची असेल, तर या मालिकेतील उर्वरित सामने जिंकावे लागतील. दरम्यान, ऑस्ट्रेलियाला या टप्प्यात अजून 4 सामने खेळायचे आहेत. भारताविरूद्धच्या मालिकेतील 2 सामन्यांव्यतिरिक्त श्रीलंका दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाला 2 सामन्यांची मालिका खेळायची आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आर अश्विननं बॉर्डर-गावस्कर मालिकेदरम्यान अचानक निवृत्ती का घेतली? अहवालात सत्य उघडकीस
आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने भावूक झाला विराट कोहली! म्हणाला…
रहाणे-पुजाराच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला…