फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये ऑलिम्पिक 2024 चं आयोजन केलं जाणार आहे. ऑलिम्पिक खेळांना 26 जुलैपासून सुरुवात होणार असून ते 11 ऑगस्टपर्यंत चालणार आहेत. दरवेळेप्रमाणेच यावेळीही चाहते ऑलिम्पिकसाठी खूप उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. त्याआधी, ऑलिम्पिकमध्ये भारत आपला शेजारी देश पाकिस्तानच्या तुलनेत किती पुढे आहे हे जाणून घेऊया. तसेच आतापर्यंत दोन्ही देशांनी ऑलिम्पिकमध्ये किती पदकं जिंकली आहेत ते ही जाणून घेऊया.
भारत – ऑलिम्पिकच्या इतिहासात भारतानं आतापर्यंत एकूण 35 पदके जिंकली आहेत, ज्यात 10 सुवर्ण, 9 रौप्य आणि 16 कांस्य पदकांचा समावेश आहे. 1900 मध्ये भारतानं पहिल्यांदा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला होता. या वेळी म्हणजेच 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारत 26व्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. गेल्या वेळी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताचे 124 खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी भारतातील 111 खेळाडू सहभागी होणार आहेत. गेल्या वेळेच्या तुलनेत यंदा खेळाडूंची संख्या कमी झाली आहे.
पाकिस्तान : पाकिस्ताननं आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये केवळ 10 पदके जिंकली आहेत, ज्यात 3 सुवर्ण, 3 रौप्य आणि 4 कांस्य पदकं आहेत. पाकिस्तानला 10 पैकी 8 पदकं फक्त हॉकीतून मिळाली आहेत. पाकिस्तान 1948 पासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. 1956 च्या मेलबर्न येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये देशाला पहिलं पदक मिळालं होतं. पाकिस्तानचं पहिलं पदक रौप्य होतं.
पाकिस्ताननं 29 वर्षांपूर्वी म्हणजेच 1992 मध्ये बार्सिलोनामध्ये झालेल्या ऑलिम्पिकमध्ये शेवटचं पदक जिंकलं होते. 1992 च्या ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानचा हॉकी संघ तिसरा राहिला आणि कांस्यपदक जिंकलं. अशा परिस्थितीत 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानला पदक मिळेल की नाही हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
2020 मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतानं एकूण 7 पदके जिंकली होती. यात नीरज चोप्राच्या एका सुवर्णपदकाचा समावेश आहे. सुवर्णाशिवाय 2 रौप्य आणि 4 कांस्यपदक होतं. कोणत्याही ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी ही सर्वाधिक पदकांची संख्या होती. या बाबतीत भारत ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“तर विराट भारतालाही विसरेल…”, शाहिद आफ्रिदीने कोहलीबद्दल केले मोठे वक्तव्य
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज
भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेची घोषणा, कर्णधाराने सोडलं नेतृत्व, संघाला मोठा धक्का