---Advertisement---

…म्हणून पोलार्ड कोहलीला म्हणाला ‘आय लव्ह यू’

On: मंगळवार, डिसेंबर 24, 2019 4:54 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात रविवारी(22 डिसेंबर) तिसरा आणि निर्णायक वनडे सामना बाराबती स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने ही वनडे मालिकाही 2-1 अशा फरकाने जिंकली.

या निर्णायक सामन्यादरम्यान एक मजेशीर घटना घडली. वेस्ट इंडिजच्या डावा दरम्यान कायरन पोलार्ड फलंदाजी करत असताना, भारतीय कर्णधार विराट कोहलीने त्याला डिवचण्यासाठी  काही शब्द उच्चारले.

कोहली त्याला म्हणाला, ‘मोठे फटके मार, तू बचाव का करतोस?’ त्यानंतरही एकदा विराटने काही शब्द पोलार्डला सुनावले. त्यावर प्रतिक्रिया देताना पोलार्ड हसला आणि म्हणाला, ‘विराट आय लव्ह यू’ 

पोलार्डच्या या उत्तराबद्दल कॉमेंट्री बॉक्समध्येही चर्चा झाली. त्यानी दोन्ही कर्णधारांमधील संभाषणाचा व्हिडिओ बघितला आणि म्हणाले की अशी चर्चा मैदानावर व्हायला हवी, परंतु त्याच वेळी पोलार्डने ज्या पद्धतीने संभाषण संपवले ते देखील उत्कृष्ट होते.

या सामन्यात पोलार्डने नाबाद 74 धावांची अर्धशतकी खेळी खेळली. त्यात त्याने 7 षटकार ठोकले होते.

रविवारी झालेल्या या निर्णायक सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला उतरलेल्या वेस्ट इंडिजने निकोलस पूरन(89) आणि कायरन पोलार्ड(74*) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 315 धावा करत भारतासमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले होते.

भारताकडून नवदिप सैनीने 2 तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाने प्रत्येरी 1 विकेट घेतली.

316 धावांचे आव्हान भारताने 48.4 षटकात 6 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून रोहित शर्मा(63), केएल राहुल(77) आणि विराट कोहली(84) यांनी अर्धशतके केली. तर शार्दुल ठाकूर नाबाद 17 आणि  रवींद्र जडेजाने नाबाद 39 धावा केल्या.

वेस्ट इंडिजकडून किमो पॉलने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शेल्डन कॉट्रेल, अल्झारी जोसेफ, जेसन होल्डरने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---