---Advertisement---

ब्रेकिंग! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर

India-Womens
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. महिला क्रिकेट संघाची ही मालिका 9 डिसेंबरपासून खेळली जाणार आहे. या मालिकेतील सर्व सामने मुंबईमध्ये खेळले जाणार आहे. त्यासाठी भारताचा संघ बीसीसीआयने शुक्रवारी (2 डिसेंबर) जाहीर केला. या मालिकेत भारत हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. तसेच उपकर्णधाराची जबाबदारी स्म्रीती मंधानाकडे आहे, मात्र महत्वाची खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाली.

या मालिकेसाठी नेटबॉलर म्हणून भारताने मोनिका पटेल, अरुंधती रेड्डी, एसबी पोखरकर आणि सिमरन बहादूर यांना निवडले आहे. त्याचबरोबर मध्यमगती वेगवान गोलंदाज पुजा वस्त्राकार (Pooja Vastrakar) दुखापतग्रस्त असल्याने तिला या मालिकेसाठी संघ निवडताना गणले नाही. ती संघाची महत्वाची खेळाडू असून तिच्या अनुपस्थितीत संघावर किती परिणाम होतील, हे मालिका सुरू झाल्यावर कळेलच.

भारताच्या संघात शफाली वर्मा, यस्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 ला, दुसरा सामना 11, तिसरा सामना 14, चौथा सामना 17 आणि पाचवा सामना 20 डिसेंबरला खेळला जाणार आहे. हे सर्व सामने भारताच्या प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार आहेत. यातील पहिले दोन सामने डी वाय पाटील स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये तर पुढील तीन सामने ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळले जाणार आहेत.

ऑस्ट्रेलियाने या मालिकेसाठी संघ जाहीर केला असून कर्णधारपद एलिसा हेलीकडे आहे. ही मालिका आगामी टी20 विश्वचषक स्पर्धेमुळे दोन्ही संघासाठी महत्वाची असणार आहे. महिलाचा टी20 विश्वचषक 2023च्या फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकामध्ये खेळला जाणार आहे. यातील पहिला सामना 10 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका यांच्यात खेळला जाणार आहे.

टी20 विश्वचषकाचा शेवटचा सामना 26 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. त्यादिवशी सामना काही कारणास्तव झाला नाही तर दुसरा दिवस म्हणजे 27 फेब्रुवारी राखीव दिवस (रिजर्व डे) असणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारताचा संघ-
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, यस्तिका भाटिया (विकेटकीपर), जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका सिंग ठाकूर, मेघना सिंग, अंजली सरवाणी, देविका वैद्य, एस मेघना, रिचा घोष (विकेटकीपर), हरलीन देओल. India announced squad for T20 series against Australia, Pooja Vastrakar is ruled out due to injury

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सामना जिंकूनसुद्धा चार वेळचा चॅम्पियन जर्मनीची विश्वचषकातून ‘एक्झिट’, जपान-स्पेन सुपर 16मध्ये
BANvsIND | वनडे मालिकेपूर्वी बांगलादेशला मोठे झटके, कर्णधार आणि ‘हा’ घातक गोलंदाज संघातून बाहेर!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---