भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला वनडे सामना शुक्रवारी ( 27 नोव्हेंबर) सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या वनडे सामन्यादरम्यान दोन्ही देशाचे खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. ऑस्ट्रेलियाच्या एका माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे काहीदिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली म्हणून खेळाडू काळी पट्टी हाताला बांधणार आहेत.
नुकत्याच झालेल्या इंडियन प्रीमियर लीगदरम्यान ऑस्ट्रेलियाचे जोन्स यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. ते आयपीएलचे समालोचक होते.
‘द सिडनी हेराल्ड’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सिडनी येथे होणाऱ्या पहिल्या वनडे सामन्यादरम्यान डीन जोन्स यांच्या सन्मानार्थ एक मिनिटाचे मौन पाळण्यात येईल आणि खेळाडू हाताला काळी पट्टी बांधून मैदानात उतरतील. त्यांच्या शानदार क्रिकेट कारकिर्दीतील महत्वपूर्ण क्षण मोठया पडद्यावर दाखवण्यात येईल.
दुसऱ्या कसोटीदरम्यानही अर्पण करणार श्रद्धांजली
मेलबर्न क्रिकेट मैदानावर दुसर्या कसोटीच्या पहिल्या दिवशी क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील जोन्स यांना श्रद्धांजली अर्पण करेल. मेलबर्न हे डीन जोन्स यांचे घरचे मैदान होते. या मैदानावर प्रेक्षकांकडून त्यांना चांगलीच दाद मिळत असे. माध्यमांतील वृत्तांनुसार, एमसीजीवरील बॉक्सिंग डे कसोटीदरम्यान हा सन्मान दिला जाईल. पहिल्या दिवशी चहाच्या विश्रांतीदरम्यान ही श्रद्धांजली दुपारी 3:24 वाजता देण्यात येणार आहे. त्या दिवशी जोन्स यांची पत्नी जेन आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित असतील.
यावेळी, स्थानिक लेखक ख्रिस ड्रिस्कोल यांची कविता वाचली जाईल. जोन्स यांच्या निधनाबद्दल त्यांनी ही कविता लिहिली आहे. संपूर्ण कसोटी मालिकेदरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रेक्षकांच्या बसण्याच्या ठिकाणी बॅनर लावण्यात येतील. इतर योजनांवरही चर्चा होत आहे.
जोन्स यांची प्रथम श्रेणी क्रिकेट मधील सर्वाधिक धावसंख्या 324 आहे. कसोटी क्रिकेटमधील कॅप क्रमांकही 324 आहे. म्हणूनच त्यांना दुपारी 3:24 वाजता श्रद्धांजली वाहण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
जोन्स यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 11 शतकांच्या मदतीने 3631 धावा केल्या तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 6063 धावा आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
ब्रेकिंग! इशांत शर्मा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘आऊट’
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात असा असू शकतो ११ जणांचा भारतीय संघ
ब्रेकिंग ! टी नटराजनचा वनडे मालिकेसाठी टीम इंडियात समावेश
ट्रेंडिंग लेख –
क्रिकेटमध्ये ६ वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ वाईट घटना ज्यामुळे हेलावले होते क्रिकेट जगत
लहानपणी अनेकवेळा रॅगिंग झालेला तरीही न खचता पुढे भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक झालेला रैना
…म्हणून सुरेश रैना आहे जगातील सर्वात दिलदार व निस्वार्थी क्रिकेटर