भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजेच बीसीसीआयची आज (२४ डिसेंबर) ८९ वी वार्षिक सभा अहमदाबाद येथे पार पडणार आहे. या सभेमध्ये तीन निवडकर्त्यांची घोषणा केली जाणार आहे. मुख्य निवडकर्ता म्हणून भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अजित आगरकरच्या नावाला पसंती मिळेल, अशी दाट शक्यता आहे. आगरकरने भारताकडून 26 कसोटी व 191 वनडे सामने खेळलेले आहेत. नवीन निवड समिती इंग्लंड विरुद्ध भारतात होणाऱ्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करणार आहे.
बीसीसीआयच्या नियमानुसार सर्वात जास्त कसोटी सामने खेळणाऱ्या व्यक्तीलाच निवड समितीचे प्रमुख बनवले जाते. सध्या सुनील जोशी हे निवड समितीचे प्रमुख आहेत. जोशींनी भारताकडून 15 कसोटी सामने खेळलेले आहेत. आगरकरचा अनुभव लक्षात घेता त्याच्या नावाला पसंती मिळण्याची शक्यता अनेक वृत्तांनुसार पुढे येत आहे. या सभेमध्ये बीसीसीआयचे उपाध्यक्ष म्हणून राजीव शुक्ला यांची निवड होणार हे जवळपास स्पष्ट आहे.
अजित आगरकर सोबतच वेस्ट झोन मधून नयन मोंगिया आणि अभय कुरुविला यांनी देखील आवेदन दिले आहे. नॉर्थ झोन मधून चेतन शर्मा, मनिंदर सिंह, विजय दहिया, अजय रात्रा आणि निखिल चोप्रा, तर ईस्ट झोनकडून शिव सुंदर दास, देबाशिष मोहंती आणि राणादेव बोसदेखील स्पर्धेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भारतीय संघात वेगवेगळ्या खेळाडूंसाठी वेगवेगळे नियम’, माजी दिग्गजाची टीका
अवघ्या एक रुपयात पोटभर जेवण.! भारताच्या माजी खेळाडूने सुरू केले गरजूंसाठी उपहारगृह
गल्ली क्रिकेट खेळणाऱ्या चिमुकल्यात दिसली वॉर्नरची झलक; चाहत्यांचा व्हिडिओला मोठा प्रतिसाद