भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 188 धावांवर गुंडाळले होते. मात्र, या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडलेला. त्यावेळी केएल राहूल व रवींद्र जडेजा यांनी नाबाद शतकी भागीदारी करत संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला. यासह यजमान संघाने मालिकेत विजयी प्रारंभ केला
A hard-fought victory for India as they take a 1-0 series lead ????#INDvAUS | ????: https://t.co/V30MqMC4km pic.twitter.com/o0EwmiAAaV
— ICC (@ICC) March 17, 2023
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळत असलेल्या भारतीय संघाला या सामन्यात प्रथम गोलंदाजीची संधी मिळाली. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात हेडला तंबूत पाठवत भारतीय संघाला चांगली सुरुवात दिली. मिचेल मार्श व कर्णधार स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
स्मिथ 22 धावा करून परतल्यानंतर मार्शने भारतीय गोलंदाजांवर आक्रमण केले. त्याने 65 चेंडूवर 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने त्याने 81 धावांची खेळी केली. त्याला जडेजाने बाद केले. यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. लॅब्युशेन 15, इंग्लिस 26 व ग्रीन 12 धावा करू शकले. तळातील फलंदाज विशेष योगदान न देऊ शकल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 188 धावांवर समाप्त झाला. भारतासाठी शमी व सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. तर, जडेजाला दोन बळी घेण्यात यश आले. हार्दिक व शार्दुल यांनी देखील एक एक गडी बाद केला.
विजयासाठी मिळालेल्या माफक धावांचा पाठलाग करताना सलामीवीर ईशान किशनल डावातील दुसऱ्याच षटकात स्टॉयनिसच्या चेंडूवर पायचीत झाला. त्यानंतकर विराट कोहली (Virat Kohli) याच्या रूपात स्टार्कने दुसरा धक्का दिला. विराटने पाचव्या षटकातील पाचव्या चेंडूवर विकेट गमावली. स्टार्कने पुढच्याच चेंडूवर म्हणजे पाचव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला चालते केले. विराट आणि सूर्यकुमार दोघांनीही आपली विकेट पायचीत होऊन गमावली. संघाची धावसंख्या 39 धावा असताना शुबमन गिलच्या रूपात भारताला चौथा धक्का बसला. स्टार्कनेच गिलला 20 धावांवर तंबूत धाडले.
यानंतर कर्णधार हार्दिक पंड्या व केएल राहुल यांनी 44 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. हार्दिकने 25 धावांचे योगदान दिले. भारतीय संघ अडचणीत असताना राहुलने जडेजाला साथीला घेत आगेकूच सुरू केली. दोघांनी अत्यंत संयमाने खेळ करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना संधी दिली नाही. यादरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. अखेर राहुलने नाबाद 75 व जडेजाने 45 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.
(India Beat Australia By Five Wickets In Mumbai ODI Shami Siraj KL Rahul Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्या आणि वनडे समीकरण जुळेना! ‘गोल्डन डक’ होत पदरी पडले आणखी एक अपयश
गिलक्रिस्ट नाही, हाच भारतीय जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू, खुद्द ऑस्ट्रेलियन दिग्गजाचा खुलासा





