सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने श्रीलंका दौऱ्यावर धमाकेदार कामगिरी केली आहे. रविवारी (28 जुलै) उभय संघांमध्ये तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील दुसरा सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघानं 7 गडी राखून विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियानं मालिका 2-0 अशी खिशात घातली. भारतानं पहिल्या टी20 सामन्यात श्रीलंकेचा 43 धावांनी पराभव केला होता. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना 30 जुलै रोजी खेळला जाणार आहे.
पल्लेकेले येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे 162 धावांचं लक्ष्य होतं. भारतीय संघाच्या 3 चेंडूत 6 धावा झाल्या होत्या, त्यानंतर पाऊस आला. अशा स्थितीत डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे भारताचं लक्ष्य 8 षटकांत 78 धावांवर आलं. यानंतर भारतीय संघानं अवघ्या 6.3 षटकांत 3 विकेट्स गमावून सामना जिंकला.
भारताकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालनं 15 चेंडूत 30 धावा केल्या. त्यानं 2 षटकार आणि 3 चौकार मारले. तर सूर्यकुमार यादवनं 12 चेंडूत 26 आणि हार्दिक पांड्यानं 9 चेंडूत 22 धावा केल्या. या मालिकेतील पहिला सामना खेळणाऱ्या संजू सॅमसनला खातंही उघडता आलं नाही. श्रीलंकेकडून महिश तिक्ष्णा, मथिशा पाथिराना आणि वानिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघानं 9 गडी गमावून 161 धावा केल्या होत्या. कुसल परेरानं 34 चेंडूत 54 धावांची खेळी केली. तर पथुम निसांकानं 32 आणि कामिंडू मेंडिसनं 26 धावा केल्या. एके काळी श्रीलंकेच्या 15 षटकांत 130 धावांत 2 विकेट्स होत्या, तेव्हा श्रीलंकेचा संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना दिसत होता.
मात्र स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्यानं एकाच षटकात कामिंदू आणि परेरा यांना बाद करून पुनरागमन केलं. यानंतर पुढच्याच षटकात फिरकीपटू रवी बिश्नोईनं दासून शनाका आणि वानिंदू हसरंगा यांना शून्यावर बाद करत श्रीलंकेला बॅकफूटवर ढकललं. बिश्नोईनं एकूण 3 बळी घेतले. तर पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांना प्रत्येकी 2 बळी मिळाले.
हेही वाचा –
क्रिकेटमधील अत्यंत दुर्मिळ घटना, ओव्हर थ्रो न होता आयर्लंडने धावत पूर्ण केल्या 5 धावा – Video
फायनल गाठूनही पाच वेळा स्वप्नभंग, अखेर 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच श्रीलंकेने उंचावला आशिया चषक
टीम इंडियाचा हार्टब्रेक! आशिया चषकाच्या फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभव