---Advertisement---

महिला U19 विश्वचषकातही टीम इंडियाने वाजवले श्रीलंकेचे बारा! दणदणीत विजयासह उपांत्य फेरीच्या आशा जिवंत

On: रविवार, जानेवारी 22, 2023 8:38 PM
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या पहिल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषकात भारतीय संघाची घौडदौड कायम राहिली आहे. सुपर सिक्स फेरीच्या दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहेत. फिरकीपटू पार्श्वी चोप्रा ही भारतीय संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली.

 

पोचेस्ट्रॅम येथे खेळला गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाला विजय अनिवार्य होता. साखळी फेरीत अजिंक्य राहिल्यानंतर सुपर सिक्स फेरीचा पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलेले. त्यामुळे या सामन्यात मोठा विजय मिळवण्याचे आव्हान भारतीय संघासमोर होते.

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. टिटस साधूने पहिल्याच चेंडूवर बळी मिळवला. यासोबतच ती अंडर 19 महिला टी20 विश्वचषकात हॅट्रिक मिळवणारी पहिली भारतीय ठरली. तिने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अखेरच्या दोन चेंडूंवर बळी मिळवलेले.

या चांगल्या सुरुवातीचा फायदा भारतीय गोलंदाजांनी उठवला. मन्नत कश्यप व पार्श्वी चोप्रा यांनी श्रीलंकन फलंदाजांना डोके वर न काढू देता एकापाठोपाठ बाद केले. मन्नतने 2 तर पार्श्वीने 4 बळी आपल्या नावे करत श्रीलंकेचा डाव केवळ 59 धावांवर संपुष्टात आणला.

चांगली धाव घेतली राखण्यासाठी भारतीय संघाला झटपट विजय मिळवावा लागणार होता. शफाली वर्मा (15), रिचा घोष (13) व सौम्या तिवारी यांनी आक्रमक फटकेबाजी करत 7.2 षटकात 3 बाद 60 धावा करत मोठा विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवला असला तरी भारतीय संघाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित नाही. सोमवारी होणाऱ्या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका यांनी आपापले सामने गमवावे, अशी प्रार्थना भारतीय संघाला करावी लागेल.

(India Beat Srilanka By 7 Wickets In Womens U19 T20 World Cup 2023)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या ‘नो-बॉल’ समस्येवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सुचविला उपाय, म्हणाला, “त्याने 100 टक्के”
इंदोर वनडे टीम इंडियासाठीच बनलाय ‘डू ऑर डाय’! तब्बल 4 वर्षांनी आलाय हा मौका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---