भारताचा १९ वर्षाखालील क्रिकेट संघ (india u19 team) विश्वचषक खेळण्यासाठी वेस्ट इंडीजमध्ये दाखल झाला आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक (u19 world cup 2022) १४ जानेवारीपासून वेस्ट इंडीजमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला सराव सामना खेळला गेला. भारताने यामध्ये १०८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. सराव सामन्यात विजय मिळवून भारताच्या १९ वर्षाखालील संघाने विश्वचषक स्पर्धेचा शुभारंभ केला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने सहा विकेट्सच्या नुकसानावर २७८ धावा केल्या. भारतीय संघासाठी सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा निशांत सिंधूने सर्वाधिक ७८ धावांची खेळी केली. यामध्ये ७ चौकार आणि ३ षटकारांचा सामना केला. भारतीय कर्णधार यश धूल यानेही अशर्धशतक पूर्ण केले. यशने या सामन्यात ६७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ५२ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त भारताचा यष्टीरक्षक फलंदाज आराध्य यादव याने ४२ धावांचे महत्वाचे योगदान दिले.
दुसरीकडे, वेस्ट इंडीजसाठी जोहान लेने याने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. वेस्ट इंडीज संघापुढे विजयासाठी २७९ धावांचे लक्ष्य मिळले होते. परंतु, त्यांचा संघ ४३ षटकात १७० धावा करून सर्वबाद झाला. वेस्ट इंडीजसाठी सलामीवीर मॅथ्यू नंदूने सर्वाधिक ५२ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त संघाचा एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. वेस्ट इंडीजसाठी १० व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला जोहान लेनेने ३३ धावांची महत्वाचे योगदान दिले. लेने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हींमध्ये फायदेशीर ठरला. परंतु संघातील इतर खेळाडू अपेक्षित योगदान देऊ शकले नाहीत. परिणामी भारताने या सामन्यात मोठा विजय मिळवला.
भारतीय संघाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रदर्शनासाठी त्यांचे अनेकांकडून कौतुक केले जात आहे. भारताचा फिरकी गोलंदाज कौशल तांबे आणि मानव पारख यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. वेगवान गोलंदाज गर्व सांगवान आणि लेगस्पिनर अनिश्वर गौतम यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. भारतीय संघाला त्यांचा दुसरा सराव सामना ११ जानेवारीला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे.
महत्वाच्या बातम्या –
सर्वाधिक विकेट्स घेऊनही संघाने केले दुर्लक्ष, खुद्द गोलंदाजाने सांगितले आरसीबीच्या निर्णयामागचे कारण
विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’
व्हिडिओ पाहा –