भारतीय संघाला अलीकडेच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडनं तीन सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाचा 3-0 असा सफाया केला. यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या भारतीय संघाच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे.
आता प्रश्न असा आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारतीय संघ हरला तर संघाचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याचं स्वप्न भंगणार का? फायनलमध्ये पोहचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 4-0 अशी जिंकावी लागेल. परंतु तसं जर झालं नाही तर काय होईल?
वास्तविक, भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉर्डर-गावस्कर मालिकेत भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 असा विजय मिळवू शकला नाही, तरीही संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकतो. टीम इंडियानं ही मालिका 4-1 अशी जिंकली, तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या संघाच्या आशा कायम राहतील. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 4-0 असा पराभव केल्यास भारताचे टक्केवारी गुण 65.79 होतील. अशा स्थितीत भारताचा अंतिम सामना खेळणं जवळपास निश्चित होणार आहे. तर ऑस्ट्रेलिया या शर्यतीतून जवळपास बाहेर पडेल.
भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली तरी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळण्याच्या संघाच्या आशा कायम राहतील. मात्र यासाठी टीम इंडियाला इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाचा 3-2 असा पराभव केल्यास भारताच्या आशा इतर संघांच्या निकालावर राहतील. अशा परिस्थितीत भारताला अंतिम फेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड-इंग्लंड मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली पाहिजे. तसेच, दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत संपली पाहिजे. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरीत सुटली पाहिजे. हे सर्व जुळून आलं, तरच भारत अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतो.
हेही वाचा –
दोन वर्ष आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही बेन स्टोक्स! बीसीसीआयचा हा नवा नियम जाणून घ्या
क्रिकेट झाला ग्लोबल! या युरोपीयन देशाच्या खेळाडूनं प्रथमच केली आयपीएल मेगा लिलावासाठी नोंदणी
विराट-बाबर आणि रोहित-रिजवान एकाच संघात खेळणार! 20 वर्षांनंतर या स्पर्धेचं पुनरागमन?