यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) भारतीय संघानं (5 जून) रोजी त्यांचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळला. या सामन्यात भारतानं एकतर्फी विजय मिळवला. न्यूयाॅर्कमधील नासाउ काउंटी आंतरराष्ट्रीय स्टेडीयमवर हा सामना खेळला गेला. या मैदानावरील खेळपट्टी गोलंदाजांसाठी उत्तम असल्याचे दिसून आले. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानं शेवटच्या आतंरराष्ट्रीय एकदिवसीय विश्वचषकाबद्दल (One Day World Cup) मोठा खुलासा केला आहे.
भारतानं 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरी केली. सेमीफायनलपर्यंत भारतानं सर्व सामने जिंकले होते. परंतु फायनलमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अदिदास इंडियाशी बोलताना म्हणाला, “जेव्हा मी एकदिवसीय विश्वचषक फायनल हारल्यानंतर पुढच्या दिवशी झोपेतून उठलो, त्यावेळी मला माहित नव्हतं की, मागच्या रात्री काय घडलं?”
पुढे बोलताना रोहित म्हणाला, (Rohit Sharma) “मी माझ्या पत्नीशी याविषयी चर्चा करताना म्हणालो, हे खराब स्वप्न होतं हो ना? मला वाटतं होतं की, फायनल उद्या आहे. मला हे समजायला 2-3 दिवस लागले की, आम्ही फायनल हारलो आहे आणि पुढच्या संधीसाठी अजून चार वर्ष वाट पाहावी लागणार आहे.”
जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया फायनल सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्सनं टाॅस जिंकून प्रथम भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं आणि 240 धावांवर भारतीय संघ सर्वबाद झाला. या सामन्यात केएल राहुलनं सर्वाधिक 107 चेंडूत 66 धावांची खेळी खेळली होती. तर कोहली 54 धावा आणि कर्णधार रोहित शर्मा 47 धावांवारती बाद झाले हाते.
ऑस्ट्रेलिया 241 धावांचा पाठलाग करताना सुरुवातीला थोडं धडपडलं. त्यानंतर सलामीवीर ट्रेविस हेडनं खेळपट्टीवर आक्रमक फलंदाजी केली आणि भारताला सामन्यावर पकड मारुन दिली नाही. त्यानं भारताकडून सामना एकतर्फी ओढून घेतला आणि ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता. यादरम्यानं हेडनं 120 चेंडूत 137 धावा ठोकल्या होत्या आणि भारतीय संघाच्या फायनल जिंकण्याच्या सर्व आशा संपुष्टात आणल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तान सावध राहा! अमेरिकेचा वादळ येणार, कर्णधार मोनांक पटेलने दिला इशारा
रोहित समोर गेल, धोनीही फेल ‘हिटमॅनने’ गाठला 600 षटकारांचा आकडा!
‘कांगारुची’ ओमानवर वरचढ 39 धावांनी केला पराभव, मार्कस स्टाॅइनिसने गाजवले मैदान!