इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाच्या गोटातून एक वाईट बातमी येत आहे. टीम इंडियाचा संघनायक रोहित शर्मा हा कोरोना पाॅझिटिव्ह आढळला आहे.
दिनांक २५ जून रोजी करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये रोहित शर्माला (Rohit Sharma) कोरोनाची लागण ( Corona Positive) झाल्याचे आढळून आले. त्यानंतर आता तो आयसोलेशनमध्ये आहे. भारतीय संघाची मेडिकल टीम त्याची काळजी घेत आहे.
रॅपिड अँटिजेन टेस्टनंतर जर रोहितच्या आरटी-पीसीआर टेस्टचाही अहवाल पॉझिटिव्ह निघाला तर हा भारतीय संघासाठी मोठा झटका असू शकतो. कारण जर त्याची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यास त्याला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर व्हावे लागू शकते. कारण त्याला कोरोनातून बरे होण्यासाठी कमीत कमी एका आठवड्याचा वेळ लागेल. अशात तो या महत्त्वपूर्ण सामन्याची मुकण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय व्यवस्थानपन रिषभ पंत याला कर्णधार बनवू शकते.
Indian captain Rohit Sharma Tested positive for COVID-19.
— Johns. (@CricCrazyJohns) June 26, 2022
इंग्लंड दौऱ्यावर ( Team India Toor England) असलेला भारतीय संघ लवकरच इंग्लंड विरूद्ध पुनर्नियोजित कसोटी ( Test ) सामना आणि त्यानंतर टी२०, वनडे मालिका खेळणार आहे. रोहित शर्मा सध्या भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार आहे. मात्र, सामन्यापूर्वी त्यालाच कोरोनाची लागण झाल्याने टीम इंडिया चिंतेत आहे. ( India vs England)
( Indian Team Captain Rohit Sharma Tested Corona Positive )
अधिक वाचा
VIDEO: पंतचा निराळा अंदाज, उमेश यादवच्या चेंडूवर जमिनीवर लोळत लगावला षटकार