---Advertisement---

कोहलीचा नादच खुळा! भारत सोडा, आशियातील कुणाला न जमलेली गोष्ट करुन दाखवली

---Advertisement---

अॅडलेड। आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 31 धावांनी विजय मिळवत चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

विराट सध्या विदेशात सर्वाधिक कसोटी सामने जिंकणाऱ्या भारतीय कर्णधारांमध्ये 10 विजयांसह दुसऱ्या स्थानावर आहे. हे 10 विजय त्याने श्रीलंका, विंडीज, आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा 5 देशांमध्ये मिळवले आहेत.

त्यामुळे त्याने विदेशातील पाच देशात कसोटी विजय मिळवण्याच्या द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. द्रविडने एकूण विदेशात पाच कसोटी विजय मिळवले तेही पाकिस्तान, विंडीज,दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि बांगलादेश अशा पाच वेगवेगळ्या देशात.

विदेशातील सर्वाधिक देशात कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत सौरव गांगुली अव्वल क्रमांकावर आहे. त्याने विदेशात 11 कसोटी विजय मिळवताना हे विजय बांगलादेश श्रीलंका, झिम्बाब्वे, विंडीज, इंग्लंड, आॅस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या देशात मिळवले आहेत.

गांगुली पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर एमएस धोनी आहे. धोनीने विदेशात 6 विजय मिळवले असून ते दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, विंडीज, बांगलादेश आणि श्रीलंका अशा वेगवेगळ्या देशात मिळवले आहेत.

त्यामुळे आता विराटला धोनी आणि गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

तसेच विराट  हा आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही देशात कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.

भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. पण त्यांना आॅस्ट्रेलियात विजय मिळवण्यात अपयश आले होते.

विदेशातील सर्वाधिक देशात कसोटी विजय मिळवणारे भारतीय कर्णधार-

7- सौरभ गांगुली

6-  एमएस धोनी

5-  राहुल द्रविड आणि विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या:

जे कोणत्याही आशियाई कर्णधाराला जमले नाही ते विराट कोहलीने करुन दाखवले!

अॅडलेड कसोटी जिंकत विराट कोहलीच्या टीम इंडियाने घडवला इतिहास

काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment