---Advertisement---

हा अनुभवी खेळाडू घेऊ शकतो यावर्षी क्रिकेटमधून निवृत्ती ?

On: मंगळवार, ऑक्टोबर 10, 2017 11:27 AM
---Advertisement---

 

गुवाहाटी । भारतीय संघातील वेगवान डावखुरा गोलंदाज आशिष नेहरा ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकतो.

भारतीय संघात खेळत असलेला नेहरा हा एक अनुभवी आणि जेष्ठ खेळाडू आहे. तो मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, राहुल द्रविड, एमएस धोनी, गौतम गंभीर आणि आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळत आहे.

पण काही रिपोर्ट्स प्रमाणे विराट कोहली हा नेहराचा शेवटचा भारतीय कर्णधार असेल ज्याच्या नेतृत्वाखाली नेहरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल.

बेंगलोर मिरर मधील एका वृत्तप्रमाणे नेहराच्या १८ वर्षाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा शेवट न्यूजीलँडविरुद्ध होणाऱ्या मालिकेत होऊ शकतो. ही मालिका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात होणार आहे.

याच वृत्तप्रमाणे जेव्हा भारत विरुद्ध न्यूजीलँड पहिला टी२० सामना फिरोजशहा कोटला मैदानावर होईल तो सामना नेहराचा शेवटचा सामना असेल. हा सामना १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

असे जर झाले तर नेहरा हा एवढा मोठा योग्य जुळून आलेला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नंतर केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरणार आहे. सचिनला शेवटचा सामना मुंबईच्या त्याच्या होम ग्राउंडवर खेळायला मिळाला होता.

सचिन आणि नेहराचे एकवेळचे संघासहकारी असणाऱ्या कुंबळे, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, झहीर आणि सेहवाग यांनाही हे भाग्य लाभले नाही. तर युवराज आणि भज्जी यांना तर भारतीय संघाची दारे आता बंद झाल्यात जमा आहेत. जर नेहराचा अंतिम सामना दिल्ली येथील फिरोजशाह कोटला मैदानावर झाला तर तो सर्वात सुदैवी खेळाडू ठरणार आहे.

नेहराने भारतीय संघातून १६३ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्यानं २३५ विकेट्स घेतल्या आहेत. जर तो कधीही दुखापतग्रस्त झाला नसता तर त्याने भारताकडून अधिक सामने खेळले असते. २०११ साली भारतीय संघाने जेव्हा विश्वचषक जिंकला तेव्हा नेहरा त्या संघाचा भाग होता.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment