भारतीय क्रिकेट संघाचा ब्रिटन दौरा आज दि.२७ जूनपासून आयर्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेने सुरू होतोय.
या आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी भारताचा युवा फिरकीपटू युजवेंद्र चहलने पत्रकारांशी बोलताना आयर्लंड आणि इंग्लड संघाविषयी आपली मते व्यक्त केली.
“मी जरी दक्षिण अफ्रिकेत चांगली कामगिरी केली असली तरी तो आता भूतकाळ आहे. मी आता आयर्लंडमध्ये आहे आणि असा विचार करतोय की मी एका चांगल्या संघाविरुद्ध खेळतोय. कुठल्याही संघाला त्यांच्या नावावरुन तोलता येत नाही.” असे भारताचा फिरकीपटू चहल म्हणाला.
“माझा हा पहिलाच ब्रिटन दौरा आहे आणि यात मी इंग्लंड विरुद्ध खेळण्यास उत्सुक आहे. पण सध्या मी २०१९ चा इंग्लंमध्ये होणाऱ्या विश्वचषकाविषयी कोणताही विचार करत नाही. विश्वचषकाचा विचार करायला आणखी खूप वेळ आहे. विश्वचषकापपूर्वी भारतीय संघाला आणखी खूप मालिका खेळायच्या आहेत.” विश्वचषकाबद्दल युजवेंद्र चहलने हे मत व्यक्त केले.
“इंग्लंडने जरी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगल्या धावा केल्या असल्या तरी ते भारताशी अलिकडच्या काळात खेळले नाहीत. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी करत बळी मिळवले आहेत. त्यामुळे भारताच्या फिरकी गोलंदाजांसाठी ही सकारात्मक बाब आहे.” असे चहल इंग्लंड संघाच्या फिरकी गोलंदाजी विषयी म्हणाला.
भारतीय संघ ३ जुलैपासून इंग्लंड विरुद्ध टी-२० मालिका खेळून इंग्लंड दौऱ्याला सुरूवात करणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बापरे! ५०० वर्ष जून्या शाळेच्या मैदानावर किंग कोहलीने केला सराव
– Video: हार्दिक पंड्याने घेतली आजी-माजी कर्णधारांची हटके…